पोस्ट्स

झरवाणी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ९१ : सरदार सरोवराची भिंती आणि जगातील सर्वात भव्य दिव्य "ऐक्यमूर्ती " statue of unity

इमेज
शूलपाणीच्या जंगलातून चालण्याचा आनंद मिळालेल्या आमच्या काळातील काही लोकांच्या परिक्रमा , या शेवटच्या परिक्रमा ठरल्या . कारण आता सगळीकडे डांबरी रस्ते झालेले आहेत .झाडीच्या प्रत्येक गावातून आता डांबरी सडकांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे असे नकाशा पाहिल्यावर लक्षात येते . मी देखील माथासर येथून निघाल्यावर संपूर्ण जंगलातून चाललो . परंतु आता माथासर ते झरवानी पक्का रस्ता झालेला दिसतो आहे . जंगलातील वाटा तुडवत चालत होतो . आजूबाजूला झाडी असल्यामुळे फारसे काही दिसत नव्हते . अजूनही डोंगरांचे चढ-उतार सुरू होते . बरेच अंतर चालल्यावर डावीकडे एक कुटी वजा आश्रम दिसू लागला . इथे देखील अर्धा मुर्धा रस्ता खणून ठेवला होता याचा अर्थ इथून रस्ता जाणार हे लक्षात येत होते . हा गजानन महाराज आश्रम होता . इथे कोणीतरी मराठी संचालक भेटणार हे लक्षात आले आणि आनंद वाटला !  संत श्री गजानन महाराज आश्रम झरवानी गुजराती लोक गजानन चा उल्लेख नेहेमी गजानंद असाच करतात ! आश्रम आता खूप छान झालेला दिसतो आहे आम्ही गेलो तेव्हा असा साधा होता इथे सर्व परिक्रमा वासी आवर्जून थांबतात क्षणभर वि