पोस्ट्स

मांगरोल लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ९६ : गुजरातमधील उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेच्या दक्षिण तटावरील मार्गक्रमणा

इमेज
 श्रीराम नामक त्या तरुण आचाऱ्याच्या हातचा महाप्रसाद घेऊन रामपुरा सोडले . पुन्हा एकदा किनारा पकडला . इथून काठाने चालण्याचा रस्ता जवळपास अशक्य या कोटीतला आहे . त्याचे महत्त्वाचे कारण असे की इथे फक्त माती किंवा फक्त दगड नसून मातीत कालवलेले दगड आहेत ! गेली लाखो वर्षे नर्मदा मातेने वाहून आणलेल्या गाळाच्या मातीमध्ये नर्मदेचीच जाडसर वाळू कालवून तयार झालेले कठीण वालुकाश्म युक्त खडक येथे आहेत . यातील एकेक खडा एकेक इंचाचा आहे . त्यामुळे याच्यावरून चालताना पायांची कसरत होते . बर हे वाळूचे टिले सरळ नसून मध्ये येऊन मिळणाऱ्या असंख्य ओढ्यांमुळे कधी दहा फूट ,कधी पंधरा फूट , तर कधी तीस फुटापर्यंत खोल गेलेले आहेत . इथे घाटावरती मला एक परिक्रमा असे भेटले . महाराष्ट्रातील नगरच्या पाथर्डी या गावचे हे परिक्रमावासी वारकरी सांप्रदायिक होते . विठ्ठल महाराज पठाडे असे त्यांचे नाव . त्यांच्या चेहऱ्यावर मला चिंता दिसले म्हणून मी विचारले की बाबाजी काय झाले ? ते मला म्हणाले की त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये परिक्रमा देखील पूर्ण करायची आहे आणि आषाढी वारी देखील गाठायची आहे . तरी कसे करावे याचा प्रश्न त्यांना पडला आह