पोस्ट्स

हांफेश्वर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक १२९ : शूलपाणी झाडीच्या उत्तर तटावरील राणीकाजल माता आणि मथवाडची नेहा

इमेज
(अपूर्ण ) नर्मदा मातेच्या उत्तर तटावरून माझी मार्गक्रमणा सुरू होती . हांफेश्वर ओलांडले म्हणजे उत्तर तटावरील शूल पाणीच्या झाडीचा मध्यभाग आला होता . वरील नकाशा मध्ये हिरव्या रंगाने दाखवलेला भाग म्हणजे शूलपाणी ची झाडी आहे . हिच्या मधोमध नर्मदा माई वाहते आहे . खाली महाराष्ट्र आणि वरती गुजरात व मध्य प्रदेशाच्या सीमा आहेत . महाराष्ट्रातील तोरणमाळ अभयारण्य , गुजरात मधील शूलपाणेश्वर अभयारण्य आणि गुजरात मध्य प्रदेश सीमेवरील रतनमहल अस्वल अभयारण्य हा सर्व शूलपाणी झाडीचाच भाग आहे . हाफेश्वर हा झाडीचा मध्यभाग असून लाल रंगाने दाखवला आहे .  इथून पुढे जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत . मला देवा दादा ने सर्व मार्ग समजावून सांगितले होते . प्रत्येकाला आपला मार्ग निवडता यावा म्हणून सर्वच मार्ग इथे व्यवस्थित देतो आहे . कृपया नीट अभ्यासावेत . सर्वात पहिला मार्ग जो खरा परिक्रमा मार्ग होता तो आता १००% जलमग्न झाला आहे याची कृपया नोंद घ्यावी . त्यामुळे जुन्या पुस्तकांमध्ये सापडणारे उल्लेख आणि मंदिरे तुम्हाला इथे आता सापडणार नाहीत .  किंबहुना सरदार सरोवर धरणाची उंची दर काही वर्षांनी थोडी थोडी वाढवली जात आह