पोस्ट्स

मधुपुरी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ३९ : अखंड रामायण सेवा चाललेली मधुपुरीची मार्कंडेय तपोभूमी घोडाघाट

इमेज
वाघाने मारलेल्या म्हशी बद्दल विचार करत पुढे चालत राहिलो . एवढ्या ताकदवान जनावराला लोळवून ठार करणारा वाघ किती शक्तिमान असेल याची कल्पनाच न केलेली बरी . आणि मुळात अशा वाघाच्या तावडीत मनुष्य प्राणी सापडला तर तो त्याचे किती हाल करू शकतो केवळ या विचाराने देखील अंगावर काटा आला ! मध्ये डाव्या हाताला एक डोंगर अखंड सोबत चालतो आहे असा भास होत होता . हा संपूर्ण डोंगर काळ्या रंगाच्या खडकांनी भरलेला होता .  पुढे गेल्यावर त्याच्या नावाची पाटी दिसू लागली . या डोंगराला काला पहाड असे म्हटले जाते . हे पर्यटकांचे खास आकर्षण असून या पहाडावरती अतिशय मोठ्या मोठ्या काळ्या रंगाच्या भव्य कातळ शिळांचा अक्षरशः खच पडलेला आढळून येतो . इथल्या राणीशी जोडलेल्या काही कथा देखील लोक या पहाडा विषयी बोलताना सांगतात . अतिशय वैचित्र्यपूर्ण असलेल्या या शिळा महाराणीच्या इशाऱ्यावर जागा सोडून हलत असत असे स्थानिक लोक मानतात.  काला पहाड वरील भव्य शिळांचा खच (संग्रहित छायाचित्रे ) अशा प्रकारच्या शिळा भारतानंतर केवळ उत्तर आयर्लंड मध्ये आढळतात आणि या करोडो वर्ष जुन्या आहेत अशी पाटी इथे

लेखांक ३८ : गोंड राजा अक्करायाची राजधानी रामनगर

इमेज
गेल्या ४८ तासात मी आजवरचे सर्वाधिक अंतर चाललो होतो . आपल्या माहिती करता मी पार केलेल्या गावांची नावे देत आहे . डिंडोरी ,सुबखर रैयत , धूरी रयत , गांगपुर माल , औराई माल ,रायपुरा माल , इमली माळ , इमली रयत , छपरी रयत , सलैया रयत ,किसलपुरी माळ , केवलारी रयत , भैंसवाही रयत , सक्का माळ , सक्का रयत , कचनारी रयत , राई रयत , हर्रा टोला , धानगांव , खम्हरिया , आण्डिया माळ , चाबी , खैरी माळ , खैरी रयत , तेडिया नाला , खाल्हे गिठौरी , मोहगांव , अण्डियादार जर , उमरदी , मोहगाव , बिन्झी , इंद्र माळ , बनियातारा , सुडगाव , डोंगरगाव , देवगांव संगम ! भारतामध्ये जर सुपीक जमीन असेल आणि पाण्याची भरपूर उपलब्धता असेल किंवा नदी जवळ असेल तर साधारण दोन किलोमीटर वर गाव बदलते . वनक्षेत्र किंवा दुष्काळी क्षेत्र असेल तर गावांचा आकार मोठा असतो व लोकसंख्या कमी असते . छोटी शहरे साधारण तीन चार किलोमीटर व्यासाची असतात . मध्यम शहरे पाच ते सहा किलोमीटर व्यासाची असतात . महानगरे दहा ते बारा किलोमीटर आकाराची असतात . अर्थात ही ढोबळ रचना मी सांगतो आहे . देश काल परिस्थितीनुसार बदल होऊ शकतो . वरील बहुतांश गावांमध्ये वनवासी जाती जमात