पोस्ट्स

नर्मदा जयंती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ४७ : पिपरहाच्या यतींसोबत साजरी केलेली नर्मदा जयंती अन् आगे शेर है !

इमेज
महादेव पिपरिया सोडल्यावर लांबच लांब वाळूचा किनारा लागला . त्यामुळे आज पायाखाली इतकी वाळू होती की चालताना दमछाक होत होती . पाणी सर्वत्र उथळ आणि पात्र अति रुंद होते . इथे काही ठिकाणी नर्मदेमध्ये वाळू उपसणारी मोठी मोठी यंत्रे लावलेली दिसतात . यांच्यामुळे नर्मदेच्या पात्राचा आकार काही काळ बदलून जातो . या चित्रांमध्ये आतपर्यंत घुसलेले जे दिसते आहे ते वाळू उपसण्याचे यंत्र आहे .नर्मदेच्या पात्रात खोलवर जाऊन तिथली वाळू हे बाहेर काढते . नंतर जेसीबी वगैरेच्या साहाय्याने ही वाळू ट्रॅक्टर आणि हायवा मध्ये भरली जाते . काही परिक्रमावासींचे असे मानणे आहे की नर्मदे काठी किती जरी वाळू असली तरी त्या खालून नर्मदेचा प्रवाह वाहत असतो त्यामुळे वाळू वरती पाऊल ठेवू नये . परंतु अशा पद्धतीने जर वाळू सोडून चालायचे ठरवले तर कधी कधी नर्मदा दीड दोन किलोमीटर दूर जाते . त्यामुळे वाळूचा किनारा आला रे आला की मी कितीही कष्ट होऊ देत परंतु नर्मदा जिथे सुरू होते त्या वाळूच्या किनाऱ्यावरून चालत असे . ही वाळू सकाळी फारच गार पडलेली असते आणि दुपारी फारच तापलेली असते . दोन्ही वेळा तिचा स्पर्श पायाला त्रासदायक असतो .