पोस्ट्स

नर्मदापुरम लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

इमेज
नर्मदा मातेचे सर्वप्रथम दर्शन मी भरूच मधील पुलावरून घेतलेले आहे . इथून रेल्वे जात असताना एकदा मला अचानक खूप ऊर्जा जाणवू लागली काहीतरी खालून मुंग्या अंगात येत आहेत असा भास झाला .  म्हणून मी चटकन बर्थ वरून उठून खाली आलो आणि पाहिले तर रेल्वे गाडी नर्मदेच्या पुलावरून चालली होती ! ते नर्मदा मातेचे आयुष्यातील पहिले दर्शन होते माझे ! त्याही वेळी नर्मदा मातेच्या काठावरील परिक्रमेचा मार्ग मला अगदी ठळकपणे दिसला होता वरून ! तिथून पुढे जेव्हा मी नर्मदा आता ओलांडली तेव्हा तेव्हा पुलावर थांबून तिचे साग्र संगीत दर्शन घेतले आहे . अगदी विमानातून सुद्धा नर्मदा मैयाचे खूप सुंदर दर्शन होते ते देखील मी अनेक वेळा केलेले आहे !  अमरावती जवळ पिंपळखुटा नावाचा एक आश्रम आहे .तिथे परमहंस सद्गुरु श्री शंकर महाराज नावाचे अतिशय थोर विभूतीमत्व , साक्षात संत निवास करतात . माझे एक मित्र श्री बाळासाहेब वाल्हेकर त्यांच्या दर्शनाकरिता दर गुरुवारी गेली तेरा वर्षे न चुकता वारी करत आहेत . पुणे ते आश्रम हे तब्बल ६६६ किलोमीटरचे अंतर बरेच वेळा ते स्वतः गाडी चालवत जातात व चालवत येतात . परमपूज्य