पोस्ट्स

जगन्नाथ पुरी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक २१ : एकादशी आयुष्याची

इमेज
साधू ने बघता बघता नदीच्या काठचा रस्ता पकडला . काठावरून म्हणजे किती काठावरून चालावे त्याने ?उजव्या हातातील काठी सतत नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडत होती इतक्या काठाने आम्ही चालत होतो . डावीकडे प्रचंड माजलेले गवत आणि झाडी होती .उजव्या हाताला खळखळून वाहणारी नर्मदा माई होती . कुठून कोणास ठाऊक परंतु एक पाऊल ठेवण्या इतका मार्ग सगळीकडे निर्माण झालेला होता . साधूने मला काठाने कसे चालायचे ते शिकवले . मला खात्री आहे की जर मी एकटा त्या मार्गावर गेलो असतो तर रस्ता नाही असे समजून परत उलटा फिरलो असतो .परंतु त्याने मला समोर रस्ता आहे का नाही हे कसे ओळखायचे ते शिकवून ठेवले . काठावरती उभे राहिल्यावर दोन चार किलोमीटर पुढील नदीची वळणे दिसतात तिथला मार्ग देखील इथूनच ताडून ठेवता येतो ती कला देखील त्याने शिकविली . वाटेत येणाऱ्या नद्या आणि नाले कसे ओलांडायचे ते देखील त्यांनी शिकविले . समोर दूरवर एखादा संगम असेल तर तो देखील अलीकडूनच कळतो, तो कसा ओळखायचा ते देखील त्याने शिकविले .नर्मदे पासून चालत चालत लांब गेल्यावर नर्मदा माता नक्की कुठल्या दिशेला आहे हे ओळखण्याची एक खतरनाक युक्ती त्याने मला शिकविली . कुठल्याही पा...