पोस्ट्स

मांडव लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक १३९ : मांडवगडचे चतुर्भुज श्रीराम प्रभु आणि रेवाभक्त राणी रूपमतीचे रेवाकुंड

इमेज
कालीबावडी आश्रमातून एकटाच निघालो . तुकाराम सुरवसे माझ्यापुढे निघालेले होते . गुरुत्तम पाटील (गुरु) मागे थांबला . थोडे अंतर सरळ चालल्यावर घाटाचा रस्ता सुरू झाला . डांबरी रस्त्याने चालण्याची वेळच कधी आलेली नसल्यामुळे चालताना खूप कंटाळा येत होता . शेवटी मी उजवीकडे असलेल्या जंगलात शिरून चटकट मार्गाने चढायला सुरुवात केली . एक-दोन चटकट लागल्यावरच मी तुकाराम बुवांच्या बराच पुढे पोहोचलो . त्यांना देखील लक्षात आले की चट-कटने लवकर चढता येईल . गुरुला हा मार्ग कळावा म्हणून मी छोट्या छोट्या दगडांचा बाण रस्त्यावर काढून ठेवला . तो देखील मागाहून त्या बाणानुसार त्याच रस्त्याने आला . हा बऱ्यापैकी उंच पर्वत होता . वरती गेल्यावर डावीकडे एक मोठा किल्ले वजा राजमहाल दिसू लागला . हे सोनगड किल्ल्याचे प्रवेशद्वार होते . अतिशय पुरातन असा हा किल्ला होता . आत मध्ये एक राजमहाल आणि काही बांधकामे होती . तुकाराम बुवांना हे पाहण्यात रस नव्हता त्यामुळे ते बाहेरच बसून राहिले . परंतु किल्ले हा माझा जीव की प्राण असल्यामुळे मी आत मध्ये जाऊन सर्व बघून आलो .  सोनगड किल्ल्यावर असलेला राजमहाल आणि कारंजी वगैरे सोनगड किल्ल्या...