लेखांक १३९ : मांडवगडचे चतुर्भुज श्रीराम प्रभु आणि रेवाभक्त राणी रूपमतीचे रेवाकुंड
कालीबावडी आश्रमातून एकटाच निघालो . तुकाराम सुरवसे माझ्यापुढे निघालेले होते . गुरुत्तम पाटील (गुरु) मागे थांबला . थोडे अंतर सरळ चालल्यावर घाटाचा रस्ता सुरू झाला . डांबरी रस्त्याने चालण्याची वेळच कधी आलेली नसल्यामुळे चालताना खूप कंटाळा येत होता . शेवटी मी उजवीकडे असलेल्या जंगलात शिरून चटकट मार्गाने चढायला सुरुवात केली . एक-दोन चटकट लागल्यावरच मी तुकाराम बुवांच्या बराच पुढे पोहोचलो . त्यांना देखील लक्षात आले की चट-कटने लवकर चढता येईल . गुरुला हा मार्ग कळावा म्हणून मी छोट्या छोट्या दगडांचा बाण रस्त्यावर काढून ठेवला . तो देखील मागाहून त्या बाणानुसार त्याच रस्त्याने आला . हा बऱ्यापैकी उंच पर्वत होता . वरती गेल्यावर डावीकडे एक मोठा किल्ले वजा राजमहाल दिसू लागला . हे सोनगड किल्ल्याचे प्रवेशद्वार होते . अतिशय पुरातन असा हा किल्ला होता . आत मध्ये एक राजमहाल आणि काही बांधकामे होती . तुकाराम बुवांना हे पाहण्यात रस नव्हता त्यामुळे ते बाहेरच बसून राहिले . परंतु किल्ले हा माझा जीव की प्राण असल्यामुळे मी आत मध्ये जाऊन सर्व बघून आलो .
सोनगड किल्ल्यावर असलेला राजमहाल आणि कारंजी वगैरेसोनगड किल्ल्याची अभेद्य तटबंदी आणि आजूबाजूचे अरण्य
या परिसरामध्ये मांडवगड पठार वगळता सर्वत्र खूप चांगले जंगल आहे
सोनगड किल्ल्याचे भव्य दिव्य प्रवेशद्वार . इथेच तुकाराम बुवा बसून राहिले आणि मी सगळा किल्ला बघून आलो .
हळूहळू गडाच्या सपाटीवर शेती सुरू झाली आणि छोट्या छोट्या झोपड्या व घरे वगैरे दिसू लागली . इथे गाडीवरून कलिंगडे विकणारा एक संघाचा स्वयंसेवक भेटला .इथले लोक गरीब असल्यामुळे तो वस्तूंच्या बदल्यामध्ये फळे विकायचा. कधी तो धान्य घ्यायचा तर कधी अन्य कुठलीही वस्तू घेऊन त्याच्या बदल्यामध्ये फळे द्यायचा . त्याने पोटभर कलिंगडे खाऊ घातली . खता शिवाय लावलेली साधी गावठी कलिंगडे असल्यामुळे आकाराने छोटी होती परंतु खूपच गोड होती . त्याच्याकडून मी मांडवगडावरील एकंदर सामाजिक ,ऐतिहासिक आणि भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतला . पुरातन किल्ल्याचे व ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष जागोजागी दिसत होते . किल्ल्याच्या वर संपूर्ण सपाटी होती . थोडेसे अंतर चालल्यावर नीलकंठेश्वर महादेवाचे मंदिर आले . हा प्रत्यक्षामध्ये एक मुसलमानी रंगमहाल होता . मंदिरे भ्रष्ट करून त्याची मशीद केल्याची अनेक उदाहरणे आपण पाहतो परंतु इथे प्रथमच मला मशिदीचे पुन्हा मंदिर केलेले पाहायला मिळाले ! मशिदीच्या कमानी आणि त्यावर लिहिलेली उर्दू अक्षरे तशीच होती . इथे पूर्वी असलेले महादेवाचे मंदिर पाडून ही मशीद किंवा रंगमहाल असलेली वास्तू उभी करण्यात आली होती . परंतु तिथे पुन्हा एकदा महादेवाचे शिवलिंग स्थापन करून त्यावर अखंड जलाभिषेक सुरू होता . हा संपूर्ण परिसर पाहण्यासारखा होता . एका नैसर्गिक ओहोळाला बांधकामांमध्ये परिवर्तित करून त्याची अखंड जलधारा शिवलिंगावर पडेल अशी योजना करण्यात आली होती . इथे अजून एक गमतीशीर आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य रचना पाहायला मिळाली . जमिनीतून वाहणारे पाणी अशा रीतीने नालीबद्ध करण्यात आले होते की एका मोठ्या वर्तुळाकारामध्ये पाणी फिरून ते बाहेर पडेल . प्रत्यक्षात डोळ्यांना बघायला थोडीशी भ्रमिष्ट करून टाकणारी ही रचना होती ! अतिशय बुद्धी चातुर्याने हे बांधकाम करण्यात आले होते . यातून अखंड पाणी वाहत असे . मी अलीकडच्या काळामध्ये टाटा मूलभूत संशोधन संस्था अर्थात टी आय एफ आर इथे काही कामानिमित्त गेलेलो होतो . तिथे असलेले शास्त्रज्ञ एक अँटेना बनवत होते . सूक्ष्मदर्शकातून हा अँटेना पहावा लागे इतका तो लहान होता . परंतु तो अँटेना पाहिल्याबरोबर मला ह्या रचनेची आठवण झाली आणि त्याचे चित्र मी त्या शास्त्रज्ञांना दाखवले ! त्यांनी आनंदाने सर्व संशोधकांना बोलावून घेतले आणि दाखवले की त्यांना सुचलेले डिझाईन हे पहिले नसून पूर्वीच भारतीय स्थापत्यकारांनी त्याचा वापर बांधकामामध्ये केलेला आहे ! तिच ही मांडवगडची प्रसिद्ध गोलाकार नाली ! या मंदिरामध्ये पर्यटकांची खूप गर्दी होती . शिवलिंग खाली खड्ड्यामध्ये होते . तिथे जाऊन दर्शन घेतले . मंदिर एका खोल दरीमध्ये बांधलेले होते . त्यामुळे पाणी थेट दरीमध्ये चालले होते .
निळकंठेश्वर महादेव मंदिर आणि त्याची दरी
हीच या मंदिरातील वैशिष्ट्यपूर्ण गोल नाली होय ! हिच्या एका बाजूने सोडलेले फुल दुसऱ्या बाजूने अलगद बाहेर पडते ! डोळ्यांना भ्रमित करणारा त्या फुलाचा प्रवास असतो !
नीलकंठ महल या वास्तूची पुरातत्त्व विभागाने लावलेली माहिती .
वास्तूमध्ये शिरण्यापूर्वी असे मोठे प्रवेशद्वार पार करावे लागते
मुख्य मंदिरासमोर मोठे कुंड असून त्याच्यापुढे गोल नाली आहे . मंदिरातले झऱ्याचे पाणी सुंदर दगडी घसरगुंडी वरून खाली आणण्यात आले आहे .
हा परिसर खूप भव्य आहे .
प्रत्यक्ष शिवलिंग एका खोल खड्ड्यामध्ये असल्यामुळे खाली उतरून दर्शन घ्यावे लागते .
शिवलिंगावर पडण्यापूर्वी पाण्याचे विशिष्ट आकाराच्या काळ्याभोर दगडी घसरगुंडीवरून असे काही वाहणे घडवले जाते की त्यातून सुंदर नाद निर्मिती होते ! वास्तुरचनाकारां ची खरोखरच खूप कमाल आहे . वास्तुविशारद लोकांनी आपल्या जुन्या भारतीय पद्धतीच्या शैलीचा पुन्हा एकदा अवलंब करावा असे फार वाटते !
इथे आणण्यापूर्वी हे पाणी एका सुंदर ओहोळाचे दोन भाग करून त्यातून थोडेसे आत वळवलेले असून जास्तीचे पाणी आपोआप बाहेर वाहून जाईल अशी सोय करण्यात आलेली आहे . हे देखील पाहण्यासारखे आहे .
शिवलिंगावर अखंड जलाभिषेक सुरू असतो
बाहेर शिवपुत्र गणेशाचे सुंदर ध्यान आहे .
अशी अनेक गुप्त भुयारे व विवरे येथे आहेत .
परंतु माणसाच्या लक्षात राहते ती मात्र ही गोल नाली च !
![]() |
इथल्या कमानीवर लिहिलेली उर्दू अक्षरे आजही स्पष्टपणे वाचता येतात . परंतु आता हे शिवमंदिर झालेले असल्यामुळे इथे एक वेगळेच पावित्र्य निर्माण झालेले आहे हे नि:संशय !
आपले एक वाचक श्री मनोज दाणी हे इतिहास अभ्यासक असून अमेरिकेमध्ये राहतात . त्यांनी या वास्तूविषयी खालील माहिती प्रस्तुत लेखकाला पुरविली .
किल्ल्याच्या देवळाच्या जागी बारादरी झाली तरी त्या जागेचा उल्लेख नीळकंठेश्र्वर असाच मोगली कागदात येतो (संदर्भ - द ग गोडसे, समंदे तलाश)
तिथे देवाची पुनर्स्थापना खुद्द चिमाजी अप्पांनी केलेली आहे! तसा सुरेख उल्लेख गोनीदांच्या दुर्गभ्रमणगाथेत आहे. असो .
तिथून पुढे निघालो आणि मांडवगडचा मध्य प्रदेश पर्यटन विकास मंडळाने केलेला विकास पाहत चालू लागलो .इथे परदेशी पर्यटक खूप मोठ्या संख्येने येतात. या गडावर गोरख चिंचेची खूपच झाडे होती . कुणीतरी मुद्दाम त्यांची लागवड केलेली आहे हे लक्षात येत होते . हत्तीच्या पायासारखे दिसणारे भव्य दिव्य खोड हे या झाडाचे वैशिष्ट्य आहे . आपल्यापैकी कोणी वाईजवळ असलेल्या मेणवली या नानासाहेब फडणवीस यांच्या गावी गेले असेल तर तिथे हत्तीचा पाय म्हणून दाखवले जाणारे एक झाड आहे , तीच ही गोरखचिंच . हे झाड मूळचे अफ्रिकेतले आहे .वाळवंटी प्रदेशात वाढत असल्यामुळे पाण्याचा प्रचंड जल साठा हे झाड आपल्या खोडामध्ये करून ठेवते . त्यामुळे याच्या खोडाचा आकार अजस्त्र वाढतो . भारतात जिथे हबशी म्हणजे आफ्रिकन लोकांच्या जुन्या वस्त्या असतात, तिथे ही जुनी झाडे सापडतात , कारण त्या लोकांकडून पूजनीय वृक्ष म्हणून तो लावला जातो असा उल्लेख असणारा एक संशोधन पर कागद देखील उपलब्ध आहे .
गोरखचिंचेचे एक झाड पुण्यात शनिपारापाशी आहे, आणि एक चक्क शनिवारवाड्यापुढे आहे, हे दुसरे नवीन झाड १९४७ नंतरचे असे वाटते .
गोरख चिंचेचे फळ
गोरख चिंचेचे फुल
गोरख चिंचेचा वृक्ष
हे झाड मूळचे आफ्रिकेतील असून भव्य दिव्य आफ्रिकन हत्ती देखील त्याच्यापुढे किती खुजा दिसतो आहे ते लक्षात यावे म्हणून हे छायाचित्र टाकले आहे .
भारतातील गोरखचिंच
गोरख चिंचेचे पान फुल आणि फळ । सौजन्य मराठी विश्वकोश
गोरख चिंचेच्या याच फळापासून भारतातील संन्यासी आपले भिक्षापात्र किंवा कमण्डलु बनवितात .
मांडवगडावर गोरख चिंचेची फळे अशी विक्रीसाठी ठेवलेली सर्रास आढळतात .
गोरख चिंचेचे फुल
गोरख चिंचेचा वृक्ष
हे झाड मूळचे आफ्रिकेतील असून भव्य दिव्य आफ्रिकन हत्ती देखील त्याच्यापुढे किती खुजा दिसतो आहे ते लक्षात यावे म्हणून हे छायाचित्र टाकले आहे .
भारतातील गोरखचिंच
गोरख चिंचेचे पान फुल आणि फळ । सौजन्य मराठी विश्वकोश
गोरख चिंचेच्या याच फळापासून भारतातील संन्यासी आपले भिक्षापात्र किंवा कमण्डलु बनवितात .
मांडवगडावर गोरख चिंचेची फळे अशी विक्रीसाठी ठेवलेली सर्रास आढळतात .
ही झाडे बघत पुढे गेल्यावर एका हॉटेल वाल्याने चहा पिण्यासाठी आत मध्ये बोलावले . अतिशय स्वच्छ नीटनेटके टापटीत हॉटेल होते . मालकाचे नाव नथुराम होते . त्याचे वडील नथुराम गोडसे यांचे भक्त होते . त्याने चहाच्या ऐवजी दिलेले शीतपेय प्राशन करून पुढे निघालो . दक्षिण भारताप्रमाणे याही भागात काही स्थानिक कंपन्यांनी आपली शीतपेये बनवलेली असल्यामुळे आंतरराष्ट्रीय शीतपेय कंपन्या येथे चालत नाहीत !
इथे मध्ये छप्पन महाल नावाचा एक वास्तू पाहायला मिळाली . इथे अतिशय सुंदर असे पुराण वस्तू संग्रहालय तसेच आदिवासी जीवनाची झलक दाखवणारे संग्रहालय उभे करण्यात आले होते . याला तिकीट होते परंतु परिक्रमावासींना मोफत होते . इथे कोणीही परिक्रमा वासी येत नाहीत असे मला त्या व्यवस्थापकाने सांगितले . आता सुद्धा तुकाराम बुवा चांगले तास दोन तास बाहेर बसून राहिले परंतु आत मध्ये येऊन त्यांनी एकही वस्तू किंवा वास्तू पाहिली नाही . मी मात्र चांगला तास दोन तास वेळ देऊन प्रत्येक मूर्ती प्रत्येक वास्तू प्रत्येक कलाकुसर अनिमिष नेत्रांनी पाहिली .
महालामध्ये अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळतात .
56 महल ची अजून एका ठिकाणी दिलेली माहिती
मूर्ती भंजकांनी तोडलेल्या अशा अनेक सुंदर कलाकृती इथे प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत
इतक्या सुंदर मूर्तींचा विध्वंस करून या राक्षसांना कुठला आनंद मिळत असेल हे खरंच कळत नाही
संग्रहालयाची बाहेर पाटी लावलेली आहे
इथे या परिसरातील आदिवासी जमातींचे काही दुर्मिळ फोटो आणि वस्तू पाहायला मिळतात .
अतिशय अप्रतिम कलाकुसर असलेल्या काही भग्न मूर्ती आपण इथे पाहू शकतो .
हे मूर्तींचे संग्रहालय नसून मूर्तींच्या अवशेषांच्या संग्रहालय आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही .
महालाची स्थापत्य शैली उत्कृष्ट आहे
असे अनेक वास्तू विशेष आपल्याला मांडवगडावर पाहायला मिळतात .ज्यांना वास्तुकलेची आवड आहे त्यांनी मांडवगडला एकदा अवश्य भेट दिली पाहिजे .
इथे काही हस्तलिखिते देखील जतन करून ठेवलेली आहेत . समकालीन लेखनाला इतिहासामध्ये फार महत्त्व असते . आजपासून काही शे वर्षानंतर आपले हे लिखाण देखील एक ऐतिहासिक पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे ! याची जाणीव ठेवूनच वस्तुनिष्ठ आणि वस्तुस्थितीला धरून लिखाण करण्याचा प्रयत्न नर्मदा मातेच्या कृपेने होत आहे .
आदिवासींच्या घराची प्रतिकृती !
आदिवासींच्या घरातील वस्तू आणि उघड्या बोडक्या डोंगरांची प्रतिकृती ! काही शे वर्षांपूर्वी इथे ताडाची झाडे होती हे पाहून मला आनंद झाला .कारण आपण नर्मदा खंडामध्ये ताडाची झाडे लावण्याचे देखील नियोजन केलेले आहे .
संग्रहालया बाहेर अशी अनेक छोटी-मोठी शिल्प ठेवलेली आहेत
पार्वती मातेची अशी भग्न मूर्ती पाहून कुठल्या शिवभक्ताला दुःख होणार नाही बरे ?
संग्रहालयाकडे जाणाऱ्या या पायऱ्या आहेत .
संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवलेले हे शिल्प मोठे आकर्षक आहे .
छपनमहाला ची मुख्य इमारत
एकंदरीत हे संग्रहालय लक्षात राहिले !
पुरातत्त्व विभागाने खूपच चांगले काम केलेले आहे .ही वास्तू पाहून पुढे निघालो .संपूर्ण मांडवगडावर अशा हजारो वास्तु पाहण्यासारख्या आहेत . अनेक महाल ,मशिदी ,मकबरे , कबरी ,दर्गे , मंदिरे , रंगमहाल , कुंडे ,तलाव , बगीचे येथे जतन करण्यात आलेले आहेत .
अशाच एका प्रचंड मोठ्या दर्ग्याच्या समोर पुरातन राम मंदिर आहे तिथे पोहोचलो . दर्गा आता संरक्षित वास्तू म्हणून जपण्यात आलेला आहे . मंदिर केवळ अप्रतिम होते .अतिशय भव्य दिव्य असा मंदिराचा परिसर होता . आणि रामाची मूर्ती तर केवळ अप्रतिम होती . ही भारतातील एकमेव चार हात अथवा चतुर्भुज असलेली रामरायाची मूर्ती आहे असे मला सांगण्यात आले . हे मंदिर रामानंदी परंपरेतील एक साधू सांभाळतात .जे साधू इथे महंत म्हणून बसलेले आहेत त्यांचा परिसरामध्ये प्रचंड दरारा आहे . महामंडलेश्वर स्वामी नृसिंहदास महाराज असे त्यांचे नाव आहे . हे मंदिर अतिशय पुरातन आहे . सज्जनगड प्रमाणे याही मंदिराला खालून भुयारी मार्ग वगैरे आहेत . परंतु अनेक वर्षे मंदिरामध्ये भाडेकरू म्हणून राहणाऱ्या लोकांनी मंदिर परिसराचे विद्रुपीकरण व व्यापारीकरण केलेले होते . यापूर्वी इथे असलेले महंत मोठेच दयाळू आणि कृपाळू असल्यामुळे त्यांनी या लोकांना कधी काही बोल लावला नाही . परंतु सध्या गादीवर बसलेले त्यांचे शिष्य हे अतिशय तुफान आणि थोडेसे सज्जन गुंड प्रवृत्तीकडे झुकलेले असल्यामुळे त्यांनी इथे राहणाऱ्या लोकांना एक महिन्याची नोटीस दिली ! आणि महिना झाल्यावर चक्क एकेकाला उचलून बाहेर काढले ! त्यानंतर त्यांनी या परिसराचा खूप चांगला विकास केलेला आहे ! दुपारी इथे असलेल्या सर्व जातीय वेदपाठ शाळेतील मुलांसोबत आम्ही भोजन घेतले . मंदिरामध्ये गेल्याबरोबर परिक्रमा वासीं साठी उजव्या हाताला एक छोटीशी धर्म शाळेची खोली होती . तिथे आम्ही सामान ठेवले होते . आम्ही म्हणजे तुकाराम बुवा सुरवसे , मी , आपला गुरूत्तम दत्ताराम पाटील आणि एक मंडला भागातील आदिवासी परिक्रमावासी इथे आम्हाला भेटला होता तो चौथा आमच्या सोबत होता . याचे नाव होते सिरोलाल. हा दिंडोरी जिल्ह्यातील बंजरटोला गावचा होता . अतिशय शांत स्वभावाचा होता . आम्ही सर्वजण भोजन प्रसाद घेण्यासाठी वरती गेलो . भोजन प्रसाद अतिशय अप्रतिम होता .वेदपाठशाळेतील मुलेच स्वयंपाक करत व तीच वाढत . आल्या आल्याच मी मला मिळालेला धनुष्यबाण चतुर्भुज रामाच्या चारी भुजांना स्पर्श करून घेतला होता ! बहुतेक ही वार्ता महंत महाराजांच्या पर्यंत कोणीतरी पोहोचवली की धनुष्यबाण घेतलेला एक परिक्रमावासी आलेला आहे . या आश्रमामध्ये एक घोडा सुद्धा होता . तो नुकताच खरेदी केलेला होता . त्याचे नाव होते देवनारायण . आश्रमात येऊन एक दोन दिवस झाल्यामुळे तो कोणालाच ऐकत नव्हता . मी भोजन प्रसाद झाल्यावर सहज वासावरून घोड्याचा ठावठिकाणा शोधून काढला आणि त्याच्याशी खेळत बसलो . ही देखील वार्ता महाराजांच्या कानावर कोणीतरी पोहचवली असावी . त्यांनी खास मनुष्य पाठवून मला भेटीसाठी पाचारण केले . या महाराजांचा सर्वच थाट मोठा राजेशाही होता ! त्या मंदिर परिसरामध्ये अनेक रस्ते आणि खोल्या होत्या त्यामुळे कुठून कुठे गेलो ते कळायचेच नाही ! वरच्या मजल्यावर त्यांनी स्वतःच्या बैठकींसाठी एक अतिशय मोठा राजवैभवाला देखील लाजवेल असा ऐतिहासिक पद्धतीने सजवलेला राजमहाल बनवलेला होता ! उत्तम उत्तम गालिचे , नक्षीदार खिडक्या महिरपी , बसण्यासाठी अतिशय उंची सोफे व आसने , त्यावर अंथरलेल्या भरजरी चादरी , सुंदर अशी झुंबरे आणि हंड्या हे सर्व वैभव पाहून मी अक्षरशः अवाक झालो ! मला वरती घेऊन आलेला जो सेवक होता त्याने मला सांगितले की हे वैभव सर्वांना पाहायला मिळत नाही कारण महाराज या दालनामध्ये कोणालाच भेटायला बोलवत नाहीत . कोणी विशेष अतिथी आले तरच त्यांना वर पाचारण केले जाते . मी त्यांना सांगितले की माझ्याबरोबर अजून दोघे तिघे परिक्रमा वासी आहेत त्यांना देखील बोलवावे . गुरु आणि तुकाराम बुवा वर आले . आदिवासी झोपून गेला . थोड्याच वेळात महाराज येण्याची वर्दी देण्यात आली . आणि एखाद्या राजाप्रमाणे अतिशय तेजस्वी आणि राजबिंडे व धिप्पाड असलेले महंत स्वामी चालत आत मध्ये आले ! त्यांचा तो रुबाब वागण्यातली अदब पाहून मला आश्चर्य मिश्रित कौतुक वाटले ! शक्यतो आपल्याकडे साधू संत फार साधे राहतात त्यामुळे त्यांना रस्त्यावरून जाताना देखील कोणी किंमत देत नाही असे दुर्दैवी चित्र पाहायला मिळते . इथे मात्र अतिशय विपरीत चित्र पाहायला मिळत होते ! महाराजांना मी दंडवत प्रणाम केला आणि त्यांच्यासमोर खाली बसलो . त्यांनी आसनावर बसण्याची विनंती केली परंतु मी परिक्रमे मध्ये असल्यामुळे जमिनीवर बसणे योग्य आहे असे त्यांना सांगितले व त्यांनी देखील ते मान्य केले . महाराज माझ्याशी बोलू लागले . " हमने आपको देवनारायण के साथ देख लिया । आप अश्वविद्या के जानकार लगते है । क्योंकी वो किसी को भी हात लगाने नही देता है । सीधा लाथ देता है । " " अश्वशास्त्र का एक छोटासा विद्यार्थी हूँ महाराज । " मी उत्तरलो . महाराजांनी अतिशय सविस्तरपणे त्यांनी हा आश्रम कसा उभा केला आणि त्याचे जुने वैभव त्याला कसे प्राप्त करून दिले हे आम्हाला सांगितले . या संपूर्ण मांडवगड परिसरामध्ये त्यांचा कसा दबदबा आणि दरारा आहे हे देखील त्यांनी उदाहरणांसह आम्हाला सांगितले . मंदिराची शेकडो एकर जागा या परिसरामध्ये आहे . त्या संपूर्ण जागेचा पुनर्विकास करण्याचा विडा महाराजांनी उचललेला आहे . ६०० एकर जागेचे पुनर्वनीकरण करण्याचा संकल्प महाराजांनी सोडलेला आहे हे ऐकून मला फार म्हणजे फार बरे वाटले ! मांडवगड हा मध्येच वरती आलेला एक पर्वत असल्यामुळे येथे पाण्याची काहीही सोय नाही . त्यामुळे इथे वर्षानुवर्षे बांधलेले शेकडो तलाव आहेत . त्यावर सर्व मांडवगडाची पाण्याची तहान भागवली जायची . परंतु अलीकडे पर्यावरणामध्ये झालेल्या बदलांमुळे इथले तलाव भरायचे बंद झालेले असून सर्वत्र कोरडे ठणठणीत तलाव पाहायला मिळतात . हे चित्र बदलण्याची प्रतिज्ञा महाराजांनी केलेली आहे . आणि हे फारच अभिनंदनीय आहे ! महाराजांनी या गडावरील सामाजिक चित्र बदलण्याचा देखील विडा उचललेला आहे . संपूर्ण नर्मदा परिक्रमेमध्ये मी पाहिलेला सर्वात तुफान साधू असे मी या महाराजांचे वर्णन करेन ! त्यांच्या बोलण्यामध्ये इतका आत्मविश्वास होता आणि इतका अभ्यास होता की असे बाकीचे सर्व साधू का होत नाहीत असा प्रश्न मला त्यांच्याकडे पाहून पडला ! महाराजांनी आदिवासी व अन्य सर्व जातीच्या लोकांसाठी इथे वेदपाठशाळा सुरू केलेली होती आणि त्यात अतिशय गोंडस मुले वेदांचे अध्ययन करत होती . महाराज हे पूर्वाश्रमीचे प्रथितयश अब्जाधीश बिल्डर होते आणि त्या काळात देखील ते गुंड प्रवृत्तीचे म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे त्यांच्या नादाला कोणी लागत नसे ! आता सर्वसंगपरित्याग केल्यावर देखील त्यांचा तो मूळ स्वभाव आहे तसाच राहिला होता . किंबहुना साधुत्वाची धार चढल्यामुळे त्या तळपत्या तलवारीला अजूनच तेज प्राप्त झाले होते ! त्यांचे सर्व राहणे वागणे बोलणे चालणे खाणे पिणे राजेशाही थाटाचे होते व त्यांच्या नशिबातच राज योग आहे हे पाहिल्यावर सहज लक्षात येत होते . सर्व संपत्ती कुळ नाम गोत्राचा त्याग गेल्यावर सुद्धा त्यांना भक्तांनी महागडी आलीशान एंडेव्हर गाडी प्रवासासाठी दिलेली होती आणि सर्व सुख सुविधा त्यांच्या मागेपुढे आपण होऊन लोळण घेत होत्या ! महाराजांनी मला थोडे दिवस थांबून देवनारायण अश्वाला प्रशिक्षित करण्याची विनंती केली . किमान परिक्रमा संपल्यावर इथे येऊन महिनाभर राहावे अशी विनंती त्यांनी मला केली . इतका मोठा माणूस माझ्यासारख्या क्षुल्लक कःपदार्थ माणसाला विनंती करतो आहे हे पाहून थोडेसे खजील व्हायला झाले आणि मी एक दिवस थांबण्याचे कबूल केले . महाराजांनी लगेचच त्यांच्या सेवकाला आज्ञा केली की आम्हाला तिघांना एक विशेष खोली देण्यात यावी आणि लगेचच त्यांची माणसे आमचे सामान घेऊन मंदिराच्या मागे बांधलेल्या नवीन भक्तनिवासामध्ये आम्हाला घेऊन गेली . महाराजांनी तिघांना तीन वातानुकूलित खोल्या देण्याचा आदेश दिला होता . परंतु मी सेवकाला विनंती केली की आम्ही तिघे एकाच खोलीमध्ये जमिनीवर झोपू .आणि वातानुकूलित खोलीची आम्हाला गरज नाही . त्याप्रमाणे एका खोलीमध्ये आम्ही तिघांनी आसन लावले . आश्रमातील मुले फारच गोड होती . मी दुपारी त्यांचे अश्व प्रशिक्षणाचे सत्र घेतले . घोडा म्हणजे काय तो कसा हाताळावा त्याच्याशी कसे वागावे त्यावर कसे बसावे वगैरे सर्व गोष्टी मुलांना शिकविल्या . मुलांना घोड्याची चित्रे काढून दिली तसेच मुलांच्या सर्व शंकांना समाधानकारक उत्तरे दिली . इस्कॉन संप्रदायाचे एक प्रभुजी इथे मुलांना शिकवण्यासाठी येऊन राहिलेले होते व सेवा म्हणून मुलांचे अध्ययन ते घेत होते त्यांनी देखील संपूर्ण प्रशिक्षण सत्र अनुभवले आणि त्यांना खूप समाधान वाटले . गुरुने नंतर त्याच्या मोबाईलवर या प्रसंगाची काही छायाचित्रे काढली जी मला तो नुकताच पुन्हा भेटला तेव्हा मिळाली .
मी जागा झालो त्याच वेळी गुरुच्या डोक्यातला ग्राफिक डिझायनर देखील जागा झाला ! मी झोपलो होतो तिथे गालीचा वर माझ्या डोक्यामागे एक वर्तुळ होते . ते माझ्या डोक्याचे तेजोवलय आहे अशी कल्पना करून त्याने मला उजवा हात उचलायला सांगितला .
आणि असा एक फोटो त्याने काढला ! हा अर्थातच आमचा चहाटळपणा किंवा शुद्ध मराठी मध्ये टाईमपास चालू होता . अशा रीतीने हात वर करून आशीर्वाद देण्याची माझी तीळ मात्र योग्यता नाही हे मला पक्के ठाऊक आहेच ! आणि त्याला देखील ठाऊक होते ! कलाकारांची प्रतिभा कशी असते हे दाखवण्यासाठी मी हा फोटो इथे टाकत आहे बाकी काही नाही .
प्रत्यक्ष अश्व प्रशिक्षण सुरू झाल्यावर काढलेले छायाचित्र . यामध्ये आपल्याला वेदपाठ शाळेतील सर्व आदिवासी मुले तसेच घोड्याची काळजी घेणारा सेवक आणि इस्कॉन चे प्रभू जी दिसत आहेत .
हाच तो तेजस्वी युवक गुरूत्तम दत्ताराम पाटील ! त्याने प्रभुजी व वेदपाठशाळेतील मुले यांच्यासोबत काढलेला सेल्फी !
मुलांना मी घोडा आणि त्याचे विविध अवयव असे चित्र काढून दिले होते त्याची त्यासोबत काढलेले छायाचित्र
या चित्रामध्ये गुरु व माझ्या डोक्याच्या मागे मुलांनी घोड्या चे चित्र धरलेले दिसत आहे . ह्याच वास्तूमध्ये मोठे सभागृह खाली होते आणि वरती भक्तांसाठी विशेष खोल्या बांधण्यात आलेल्या होत्या .
अतिशय अविस्मरणीय असा हा दिवस होता
मुलांना व प्रभुजींना हे प्रशिक्षण खूप आवडले
इथल्या मुलांची शिस्त साधेपणा व नम्रता पाहून मी खरोखरीच खूप अचंबित झालो
एकंदरीत एकाच दिवसामध्ये देवनारायण घोडा असा काही तयार झाला की त्यावर प्रत्येक मुलाला बसवून मी छोटीशी चक्कर मारवली ! मागे आपल्याला किल्ल्याची तटबंदी दिसते आहे . त्याच्या मागे असलेल्या मोकळ्या मैदानात नेऊन आधी घोड्याला मी थोडेसे काम दिलेले होते .
मंदिर ही भव्य दिव्य आहे . याच अंगणामध्ये स्वामीजींसोबत मी रात्रभर गप्पा मारत बसलो होतो .
इथे अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत
मंदिर परिसरामध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय वस्त्रे परिधान करणे अनिवार्य आहे
मंदिरात सर्व जुन्या परंपरा चालू असून आजही आरतीला नगारा वाजविला जातो
वेदांचे अध्ययन करणारी आदिवासी मुले मंदिरातील मुख्य पुजारी म्हणून कार्यभाग पाहतात ही खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे !
मंदिराच्या मागच्या महाद्वारापाशी देवनारायण अश्व बांधलेला असतो .
हा अश्व देखील फार सुंदर सदगुणी आणि सुलक्षणी आहे
वरती दिसणाऱ्या खिडक्या म्हणजे महाराजांचा बैठकीचा महाल आहे .
मंदिरातून बाहेर पडल्या पडल्या समोरच मोठी बाजारपेठ आहे
रामरायाचे भव्य कट आउटस मंदिरात आपले स्वागत करतात .
जिथे श्रीराम प्रभू तिथे हनुमान प्रभू असणारच !
रामरायाचे मंदिर दगडात बांधलेले आणि अतिशय सुंदर आहे
राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती देखील अतिशय सुंदर असून रामरायाची मूर्ती अर्थातच चतुर्भुज आहे .
महाराजांची बैठकीची खोली अशी आहे .
मांडवगडच्या चतुर्भुज राम मंदिराचे पीठाधीश्वर महंत कोण कोण होते त्यांची यादी इथे लावलेली आहे .
हेच ते चतुर्भुज रामचंद्र
जांब समर्थ या श्री रामदास स्वामी यांच्या जन्म गावातील त्यांचे देवघर . इथे या रामामूर्तिंची पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी बाहेर त्या दर्शनासाठी ठेवल्या होत्या तेव्हा अखंड 24 तास या मूर्तींसोबत बसण्याचे भाग्य प्रस्तुत लेखकाला लाभले होते !
प्रत्यक्ष अश्व प्रशिक्षण सुरू झाल्यावर काढलेले छायाचित्र . यामध्ये आपल्याला वेदपाठ शाळेतील सर्व आदिवासी मुले तसेच घोड्याची काळजी घेणारा सेवक आणि इस्कॉन चे प्रभू जी दिसत आहेत .
हाच तो तेजस्वी युवक गुरूत्तम दत्ताराम पाटील ! त्याने प्रभुजी व वेदपाठशाळेतील मुले यांच्यासोबत काढलेला सेल्फी !
मुलांना मी घोडा आणि त्याचे विविध अवयव असे चित्र काढून दिले होते त्याची त्यासोबत काढलेले छायाचित्र
या चित्रामध्ये गुरु व माझ्या डोक्याच्या मागे मुलांनी घोड्या चे चित्र धरलेले दिसत आहे . ह्याच वास्तूमध्ये मोठे सभागृह खाली होते आणि वरती भक्तांसाठी विशेष खोल्या बांधण्यात आलेल्या होत्या .
अतिशय अविस्मरणीय असा हा दिवस होता
मुलांना व प्रभुजींना हे प्रशिक्षण खूप आवडले
इथल्या मुलांची शिस्त साधेपणा व नम्रता पाहून मी खरोखरीच खूप अचंबित झालो
एकंदरीत एकाच दिवसामध्ये देवनारायण घोडा असा काही तयार झाला की त्यावर प्रत्येक मुलाला बसवून मी छोटीशी चक्कर मारवली ! मागे आपल्याला किल्ल्याची तटबंदी दिसते आहे . त्याच्या मागे असलेल्या मोकळ्या मैदानात नेऊन आधी घोड्याला मी थोडेसे काम दिलेले होते .
महाराजांना हे सर्व वृत्त कोणीतरी कळविलेच . त्यांना देखील खूप आनंद झाला . रात्रीचे भोजन केल्यावर महाराजांनी तुमच्यासाठी वेळ राखून ठेवला आहे असा निरोप मला देण्यात आला . फक्त दोघा तरुणांनी येऊन भेटावे असे देखील सांगण्यात आले ! त्याप्रमाणे तुकाराम महाराज झोपल्यावर मी आणि गुरु महाराजांना भेटण्यासाठी गेलो . भोजन प्रसाद घेतल्यावर मंदिराच्या अंगणामध्येच महाराज खुर्चीवर बसले आणि आम्ही दोघे त्यांच्या पायाशी बसून गप्पा मारू लागलो . साधारण तासाभराने गुरुला झोप येऊ लागली व त्याने महाराजांची रजा घेतली . महाराजांना दुसऱ्या दिवशी प्रवासाला जायचे होते . त्यामुळे त्यांनी रात्री दोन वाजेपर्यंत असा वेळ माझ्यासाठी राखून ठेवला होता ! संध्याकाळी आठ नऊ पासून रात्री दोन पर्यंत सलग आम्ही दोघे बोलत होतो .त्यांच्या डोक्यात काय काय प्रकल्प आहेत ते सर्व त्यांनी मला सांगितले . व त्यासाठी एखाद्या निस्पृह योजक व्यक्तीची त्यांना नितांत गरज होती . त्यांचे सर्वच प्रकल्प अतिशय अप्रतिम होते . योग्य वेळ आल्यावर व नर्मदा मातेचा आदेश मिळाल्यावर मी नक्की मदतीसाठी उपस्थित राहीन असे महाराजांना सांगितले . विशेषतः महाराज महाविद्यालयातील तरुण तरुणींवर भरपूर काम करत होते . योग्य वयात तरुणांचे प्रबोधन करणे किती आवश्यक आहे हे महाराजांना चांगले माहिती होते . त्यांच्या या सर्वच प्रकल्पांची गरज खरे तर आपल्या संपूर्ण देशाला आहे . इतक्या मोठ्या महंताने रात्री दोन वाजेपर्यंत चा अमूल्य वेळ माझ्यासाठी वेळ राखून ठेवणे हे खरेतर माझे अहोभाग्य होते .
आम्ही बऱ्याच विषयांना स्पर्श केला . महाराजांचे दिवसा पाहिलेले भीतीदायक स्वरूप आणि आता मी अनुभवत असलेले निर्मळ निखळ व तळमळीचे महाराज ही दोन्ही रूपे एकाच व्यक्तीमध्ये आहेत यावर विश्वास बसत नव्हता ! मला त्यांच्याशी बोलताना जरा देखील भीती किंवा अंतर जाणवत नव्हते . जे माझ्या मनात आहे ते सर्व मी बोलू शकत होतो . महाराजांनी देखील कुठलीही आडकाठी न ठेवता त्यांच्या भावना माझ्यापुढे व्यक्त केल्या . एकंदरीत तिथे एक दिवस थांबलो हे फार भाग्याचे ठरले असेच म्हणावे लागेल .
या भागाचे थोडेसे दर्शन आपल्याला गुगल वर मिळालेल्या चित्रांच्या माध्यमातून घडवितो .
तुळशी वृंदावन पारंपारिक रांगोळ्या काव यांनी सजवलेला हा परिसर आपल्याला थेट पुराणकाळात घेऊन जातो .![]() |
रामरायाचा विग्रह अतिशय सुंदर आहे |
मंदिर ही भव्य दिव्य आहे . याच अंगणामध्ये स्वामीजींसोबत मी रात्रभर गप्पा मारत बसलो होतो .
इथे अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत
मंदिर परिसरामध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय वस्त्रे परिधान करणे अनिवार्य आहे
मंदिरात सर्व जुन्या परंपरा चालू असून आजही आरतीला नगारा वाजविला जातो
वेदांचे अध्ययन करणारी आदिवासी मुले मंदिरातील मुख्य पुजारी म्हणून कार्यभाग पाहतात ही खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे !
मंदिराच्या मागच्या महाद्वारापाशी देवनारायण अश्व बांधलेला असतो .
हा अश्व देखील फार सुंदर सदगुणी आणि सुलक्षणी आहे
वरती दिसणाऱ्या खिडक्या म्हणजे महाराजांचा बैठकीचा महाल आहे .
मंदिरातून बाहेर पडल्या पडल्या समोरच मोठी बाजारपेठ आहे
रामरायाचे भव्य कट आउटस मंदिरात आपले स्वागत करतात .
जिथे श्रीराम प्रभू तिथे हनुमान प्रभू असणारच !
रामरायाचे मंदिर दगडात बांधलेले आणि अतिशय सुंदर आहे
राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती देखील अतिशय सुंदर असून रामरायाची मूर्ती अर्थातच चतुर्भुज आहे .
महाराजांची बैठकीची खोली अशी आहे .
मांडवगडच्या चतुर्भुज राम मंदिराचे पीठाधीश्वर महंत कोण कोण होते त्यांची यादी इथे लावलेली आहे .
हेच ते चतुर्भुज रामचंद्र
या रामरायाची फारशी भक्ती कधी आपल्याला जमलेली नाही परंतु याचा आणि आपला काहीतरी खास संबंध आहे खरा !
कमरेच्या दुखण्यामुळे अयोध्येच्या मंदिर संस्थापनेला जाता आले नाही याची दुःख होते परंतु अचानक एक दिवस आपले एक वाचक ,जे आयोध्येच्या राम मंदिर व्यवस्थापनामध्ये होते त्यांनी रामजन्मभूमीच्या उत्खननामध्ये सापडलेली माती एके दिवशी भरून हातात आणून दिली !
आपले उभे आयुष्य श्री रामचंद्रांच्या दास्यत्वामध्ये व्यतीत केलेले समर्थ रामदास स्वामी यांना राम म्हणजे हा देव हे ज्या मूर्तीकडे पाहून कळले त्या जांब समर्थ येथील त्यांच्या देवघरातील राममूर्ती मध्यंतरी चोरीला गेल्या होत्या व ते प्रकरण संपूर्ण देशभर गाजलेले होतेच . त्या मूर्ती जेव्हा सापडल्या तेव्हा त्यांच्या पुनर्रप्राणप्रतिष्ठेसाठी जाण्याचे भाग्य मला लाभले होते .समर्थांच्या घराण्यातील वंशज श्री भूषण स्वामी यांनी मला आग्रहाने आमंत्रित केले होते . पोलीस स्थानकातून त्या मूर्ती ताब्यामध्ये घेताना साक्षीदार म्हणून सही करण्याचे भाग्य या पामराला लाभले . तसेच मुख्य मंदिरामध्ये त्याची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करताना ती मूर्ती अर्थात साक्षात प्रभू रामरायाची मूर्ती , जिच्याकडे पाहून समर्थ लहानाचे मोठे झाले ! ती डोक्यावर घेऊन गाभाऱ्यामध्ये नेण्याचे भाग्य मला लाभले !
याहून अधिक आयुष्यात काय मिळवायचे राहिले आहे असे या प्रसंगाकडे पाहिल्यावर आवर्जून वाटते !
जांब समर्थ या श्री रामदास स्वामी यांच्या जन्म गावातील त्यांचे देवघर . इथे या रामामूर्तिंची पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी बाहेर त्या दर्शनासाठी ठेवल्या होत्या तेव्हा अखंड 24 तास या मूर्तींसोबत बसण्याचे भाग्य प्रस्तुत लेखकाला लाभले होते !
समर्थांच्या वडिलांनी पुजलेल्या सर्व मूर्ती आपल्याला दिसतील ! सोबत उदगीर मठाचे मठपती आहेत . शेवटी इतकेच म्हणावेसे वाटते ,
रामा मी तव दास दास म्हणवी । मा ते कशाचे भय ।
रामा जाईन ज्या स्थळी सुखघना । होईल तेथे जय ॥
रामा या भुवनत्रयी तुजविणे । नाही दुजा तारक ।
रामा तू सकलार्थ पूर्ण करीसी । तू तात मी बालक ॥
रामा तुझियेनी स्वामीपणे । मी हे ब्रम्हांड मानिले ठेंगणे ।
स्वामी तुजविणे कोण जाणे । अंतर अमुचे ॥
रामचंद्र तुझा वियोग । ऐसा नको रे प्रसंग ।
तुजकारणे सर्व संग । त्यक्त केला ॥
असा हा चतुर्भुज राम आणि हेच ते साक्षात नृसिंह स्वरूप महामंडलेश्वर नृसिंह दासजी महाराज
रामाने रावणाला ज्या पद्धतीचे अंतिम दर्शन दिले होते तसा हा विग्रह आहे . त्याच्या एका हातात बाण एका हातात धनुष्य एका हातात कमळ आणि एका हातात जपाची माळ आहे तसेच खाली अंगद आणि मारुती उभे आहेत .रामाची मूर्ती इस ९०१ सालातली आहे .
इथे लावलेली कवी संदीप शर्मा यांनी केलेली मांडव का हेसच ही कविता फार सुंदर आहे .
मंदिराच्या प्रवेशद्वारावर देखील सनावळीचा उल्लेख आहे
हेच ते महंत रामनारायणदास ज्यांच्या मवाळ स्वभावामुळे या मंदिरात खूप लोक येऊन राहिले होते .
मंदिराची थोडक्यात माहिती वरील प्रमाणे आहे .
रामाने रावणाला ज्या पद्धतीचे अंतिम दर्शन दिले होते तसा हा विग्रह आहे . त्याच्या एका हातात बाण एका हातात धनुष्य एका हातात कमळ आणि एका हातात जपाची माळ आहे तसेच खाली अंगद आणि मारुती उभे आहेत .रामाची मूर्ती इस ९०१ सालातली आहे .
इथे लावलेली कवी संदीप शर्मा यांनी केलेली मांडव का हेसच ही कविता फार सुंदर आहे .
मंदिराच्या प्रवेशद्वारावर देखील सनावळीचा उल्लेख आहे
हेच ते महंत रामनारायणदास ज्यांच्या मवाळ स्वभावामुळे या मंदिरात खूप लोक येऊन राहिले होते .
मंदिराची थोडक्यात माहिती वरील प्रमाणे आहे .
लाल रंगाने दाखविलेल्या राम मंदिराच्या तुलनेमध्ये जामी मज्जिद आणि होशंग शहा चा मकबरा किती मोठा आहे हे आपल्याला हिरव्या रंगाने अंकित केलेला प्रदेश पाहिल्यावर लक्षात येईल . हा मूळ राम मंदिराचा परिसर होता . जेव्हा होशंग्याचा धर्मच अस्तित्वात नव्हता तेव्हापासून इथे मंदिर आहे .
मांडव का सच या कवितेचे नवीन स्वरूप आता तिथे लावण्यात आले आहे . हे सत्य अगदी डोळे उघडणारेच आहे !
मांडव का सच या कवितेचे नवीन स्वरूप आता तिथे लावण्यात आले आहे . हे सत्य अगदी डोळे उघडणारेच आहे !
ऊन सम्राटोंकी कब्र पर आज कुत्ते पेशाब करते है । या वाक्याचा तर मी बाहेर आल्या आल्या लगेचच अनुभव घेतला !
समोरच असलेल्या दर्ग्याच्या भिंतीवर हद्द आखणारा कुत्रा मी पाहिला . राम मंदिरातून बाहेर पडल्यावर थोडेसे उलटे गेल्यावर मंडपेश्वर महादेवाचे अति प्राचीन मंदिर आहे त्याचे देखील सर्वांनी दर्शन घेतले .
श्री मंडपेश्वर महादेव
दिंडोरी चा आदिवासी परिक्रमावासी सिरोलाल , प्रस्तुत लेखक आणि गुरु . आधी मी नियमानुसार खुर्चीवर बसत नव्हतो . परंतु रस्त्यावर बसण्यापेक्षा किंवा खाटेवर बसण्यापेक्षा खुर्ची बरी म्हणून अखेरीस बसलो .
आमच्या मागे एनपीटी माळवा रिसॉर्ट होते . समोरच या दुकान होते .
इथून आम्ही सर्वजण एकत्रच निघालो . वाटेमध्ये मार्कंडेश्वर महादेवाचे मंदिर आहे त्याचे मी दर्शन घेतले . तोपर्यंत शेजारी असलेल्या एका दुकानदाराने रस्त्यावरच खुर्च्या लावून आम्हाला बसायला सांगितले . आणि उत्तम पैकी चहा पाजला . त्या ठिकाणी गुरुने काही फोटो काढले . ते अलीकडेच मला मिळाले . ते आपल्यासाठी सोबत जोडत आहे .
गुरुने काढलेला सेल्फी . याच्यामध्ये आपल्याला तुकाराम बुवा सुरवसे यांची मजबूत तब्येत दिसत आहे .दिंडोरी चा आदिवासी परिक्रमावासी सिरोलाल , प्रस्तुत लेखक आणि गुरु . आधी मी नियमानुसार खुर्चीवर बसत नव्हतो . परंतु रस्त्यावर बसण्यापेक्षा किंवा खाटेवर बसण्यापेक्षा खुर्ची बरी म्हणून अखेरीस बसलो .
आमच्या मागे एनपीटी माळवा रिसॉर्ट होते . समोरच या दुकान होते .
सिरोलाल हा "सायलेंट मोड " "ऑन " केलेल्या "मोबाईल " प्रमाणे होता ! तो कुठल्याही गोष्टीवर अजिबात प्रतिक्रिया देत नसे किंवा काही बोलत देखील नसे . चालायला मात्र तो खरोखरच वाघ होता . अतिशय वेगाने अंतर कापण्याची कला त्याच्याकडे जंगलात राहणारा असल्यामुळे जन्मत:च आलेली होती .अतिशय अल्प सहवासामध्ये त्याने आमची सर्वांची मने जिंकली .
इथून पुढे चालत आम्ही रेवा कुंडापर्यंत आलो . रेवा कुंड हा एक मोठा तलाव आहे . तो वर्षभर पाण्याने भरलेला असतो . परंतु मी गेलो तेव्हा मात्र त्याच्या शेवटच्या खोल खड्ड्यामध्ये थोडेसे पाणी शिल्लक राहिले होते . त्यातच लोक स्नान करत होते कपडे धूत होते . त्यामुळे ते पाणी अत्यंत हिरवे आणि प्रदूषित झाले होते . तरीदेखील मी रेवा मातेचे स्मरण करून त्याचे आचमन केले . रूपमती नावाची मेंढपाळ सुंदरी जी नंतर बाज बहादुर राजाची राणी झाली , ती रोज मांडवगडावरून नर्मदा मातेचे दर्शन घ्यायची . ते झाल्या शिवाय अन्नग्रहण करत नसे .एकदा काही कारणामुळे , ढगाळ वातावरणामुळे तिला दर्शन घडले नाही तेव्हा साक्षात नर्मदा मैया तिच्या दारात , रेवा कुंडात प्रकट झाली अशी आख्यायिका आहे . म्हणूनच परिक्रमावासी या कुंडाला ओलांडून पुढे जात नाहीत . हे पाणी नर्मदा मातेचे असल्याचे अनेक प्रकारे सिद्ध झालेले आहे असे स्थानिक लोकांनी मला सांगितले .
मी गेलो तेव्हा मात्र लाल बाणाने दाखवलेला चौकोनी हौद आहे तेवढाच पाण्याने भरलेला होता बाकी सर्व कोरडे ठणठणीत होते .
इथून जवळच राणी रूपमतीचा महाल आहे . तो पाहून गड उतरायला सुरुवात केली .
संगीत प्रेमी राजा बाजबहादुर आणि राणी रूपमती यांच्या जीवनावर एक चित्रपट देखील येऊन गेलेला असून त्यातील गाणी प्रसिद्ध आहेत . "आ लौट के आजा मेरे मित " हे त्यातील आजरामर गीत आहे .
राजाचा पराभव झाल्यावर मुस्लिम शासकांच्या हाती न लागता राणी रूपमतीने विष प्राशन करून आत्महत्या केली होती . असे तेजस्वी चरित्र असलेली रूपमती राणी बाकी सर्वांच्या विस्मरणात गेलेली असली तरी परिक्रमा वासियांच्या मात्र चांगली लक्षात राहते ! तिच्या उत्कट रेवा भक्तीमुळे आजही परिक्रमावासीयांना ६० ते ७० किलोमीटरचा फेरा मारावा लागतो !
मांडवगडाची उतरण थोडीशी कठीण आहे असे मानले जाते . कारण पायाखाली सरकणारी वाळू किंवा मुरूम आहे . त्यात उन्हाचा तडाखा असेल तर उतरताना खूप त्रास होऊ शकतो .इथे उतरताना काही लोकांनी आपला प्राण देखील वेचलेला आहे . हे सर्व ऐकलेले असल्यामुळे सावकाश उतरायचे ठरवले परंतु ऐकले होते तितका काही हा मार्ग कठीण निघाला नाही . ज्यांना गिरी भ्रमणाची सवय आहे त्यांच्यासाठी हा मार्ग खूप सोपा आहे . अतिशय वेगाने धावतच हा मार्ग उतरलो . कधी एकदा रेवा माईला भेटतो असे मला झाले होते ! सुमारे ३५ ते ४० किलोमीटर अंतरावर नर्मदा मातेचे मुख्य पात्र लागणार होते . जलकोटी या गावातल्या सहस्रधारेपाशी पोहोचावयाचे होते . मध्ये कुठेही थांबण्याची इच्छा नव्हती . त्यामुळे पायांना अभूतपूर्व गती प्राप्त झाली . रूपमतीला दिसायचे तसे नर्मदा मातेचे रूप या मूढमतीला दिसत नसले तरी तिच्या नामाचा आधार होता . नाम आणि रूप ही एक अजोड जोडी आहे ! तिचे नाम उच्चारताच पावलांना जणु पंख लाभले ! प्रत्येक पावलाला एकच एक धावा सुरू झाला ! नर्मदे हर ! नर्मदे हर !
लेखांक एकशे एकोणचाळीस समाप्त (क्रमशः )
🙏🙏🙏नर्मदे हर।।
उत्तर द्याहटवानर्मदे हर 🙏
उत्तर द्याहटवानर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवानर्मदे हर
उत्तर द्याहटवासद्ध्या उत्तर प्रदेशच्या संभल मधे एक ४६ वर्षे बंद असलेले शिवमंदिर पोलिसांच्या उपस्थितीत नुकतेच उघडण्यात आले . राज्याकर्ते पाठीशी असल्यामुळेच केवळ पोलीसांकडे हे धैर्य आले हे निश्चित . तुम्हाला परिक्रमेत तीन चार ठिकाणी तरी अशी अतिक्रमण केलेली मंदिरं दिसल्याचा उल्लेख आहे . या सगळ्या ठिकाणांची माहिती मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठवावी म्हणजे ती मंदिरं सुद्धा अताक्रमणाच्या विळख्यातून बाहेर पडतील .
उत्तर द्याहटवाबौद्धिक दिवाळखोरी प्रदर्शित न करेल , तो अंधभक्तच कसला ??
हटवानर्मदे हर 🙏🙏
उत्तर द्याहटवानर्मदेचे वर्णन, तुम्हांला आलेले अनुभव हे सर्व वाचून तुमच्यासोबतच आमच्या वाचकांची देखील परिक्रमा चालू आहे असे वाटते. नर्मदे हर
उत्तर द्याहटवापुढील भाग कधी येणार आहेत
उत्तर द्याहटवाबाबाजी, नववर्षाच्या शुभेच्छा.
उत्तर द्याहटवाआपल्या लिखाणामुळे
प पु सद्गुरू , गुरूपरंपरा आणि नर्मदामाता ह्यांच्या निर्व्याज प्रेमळपणाची, उपकारांची , अस्तित्वाची अखंड जाणीव होत राहील.
धन्यवाद.
नर्मदे हर
उत्तर द्याहटवामंदार