पोस्ट्स

जलकोटी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक १४० : कारम-बुटी-रेवा त्रिवेणी संगमावरील उचावदचा बडा महादेव आणि जलकोटीच्या सहस्रधारेजवळील एकमुखी दत्त

इमेज
मांडवगडचा उतार चांगलाच तीव्र होता . रस्ता बऱ्यापैकी ओसाड होता . वाटेमध्ये झाडे किंवा सावली असे काही नव्हते . आजूबाजूला तसे बरे जंगल आहे . परंतु उतरण्याचा रस्ता प्रशस्त असल्यामुळे ओसाड झालेला होता . प्रचंड खड्डे मुरूम दगड यांनी भरलेला धुळीचा अन् उताराचा रस्ता होता . प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावे लागे .जरा दुर्लक्ष झाले की खर्रकरून पाय घसरायचे . वयस्कर माणसांसाठी आणि पाचवारी लुगडे नेसून परिक्रमा करणाऱ्या मध्यप्रदेश मधील ग्रामीण स्त्रियांसाठी हा उतार थोडासा घातकच होता . रूपमती राणीच्या महालापासून शबरी आश्रमा पर्यंत येणारी पायवाट या नकाशात दिसत आहे . परिक्रमेमध्ये किंवा एरवी सुद्धा लक्षात ठेवण्याचे सोपे सूत्र म्हणजे चढणे हे उतरण्यापेक्षा नेहमी सोपे असते हे कायम ध्यानात ठेवावे . उतरताना गुडघ्यांची आणि पायांच्या सांध्यांची जी काही वाट लागते ती अभूतपूर्व असते . अशी पायांची वाट लागलेली असताना भर तापलेल्या वाळवंटात एखाद्याला अचानक समोर मोठे सरोवर दिसावे तसे मला एक छोटीशी कुटी बांधून केलेला आश्रम पाहून झाले ! मूळचे शिरपूर येथील असलेले कुणाल पाटील नामक एक तरुण तडफदार वारकरी महाराज ...