पोस्ट्स

देव नदी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर

इमेज
देव नदी नावाची परमपवित्र नदी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांना जोडते .तिच्या एका काठावर गुजरात तर दुसऱ्या काठावर महाराष्ट्र आहे . याच नदीच्या नर्मदा संगमावर शूलपाणेश्वराचे पुरातन मंदिर होते असे मला स्थानिकांनी सांगितले . हे गाव महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये आहे . त्यामुळे मंदिराचे पुनर्वसन करावे लागणार हे लक्षात आल्यावर महाराष्ट्र सरकारने नवीन मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक होते . परंतु तत्कालीन महाराष्ट्र सरकारने मंदिरासाठी जागा न दिल्यामुळे नरेंद्र मोदी यांनी हे मंदिर गुजरात मध्ये पळवले आणि गोरा कॉलनी या गावामध्ये भव्य दिव्य मंदिर पुनर्निर्माण करून दाखविले . नर्मदे काठचे हक्काचे एक अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र अशा रीतीने महाराष्ट्राने गमावले . आज सकाळपासून मी सुमारे ३५ किलोमीटर चाललो होतो . देव नदीचा सुखद सहवास डाव्या हाताला होता . महाराष्ट्राची भूमी सोडून पलीकडे जावे असे वाटतच नव्हते ! असे वाटायचे की हाच काठ पकडून थेट नर्मदा मैयाचा किनारा गाठावा ! परंतु देव नदी अतिशय खडतर मार्ग क्रमणा करत नर्मदार्पण होते . त्यामुळे अखेरीस तिला ओलांडलेच . आणि कणजी या गुजरात मधील पहिल्या गावामध्ये आल