पोस्ट्स

जलेबी पोहा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक ९ : इंदौरी पोहा आणि गरमा गरम जलेबी !

इमेज
सगळे आटोपून निघेपर्यंत वेळ झाली होती ११ : ११ !  सूर्य चांगलाच तळपत होता , त्यामुळे थंडी जाणवत नव्हती .नर्मदेच्या काठाकाठाने चालत चालत निघालो . माझ्या असे लक्षात आले की वाटेत लोकच तुम्हाला रस्ता सांगतात .लोक सांगू लागले ,बाबाजी यहा से जाओ । बाबाजी वहा से जाओ । त्याप्रमाणे पुढे चालत राहिलो . वाटेमध्ये एक आयुर्वेदिक महाविद्यालय लागले . मला कोणीतरी असे सांगितले होते की मध्येच पोलीस तुम्ही करोना लस घेतली आहे का नाही याची तपासणी करतात व लस घेतली नसेल तर घरी पाठवतात . मी एक डोस कागदोपत्री घेतला होता . त्यामुळे दुसरा डोस मिळतो का ते पाहण्याकरता आयुर्वेदिक कॉलेजमध्ये चौकशी केली .  तिथले मुख्य डॉक्टर भेटले . त्यांनी सांगितले , तुम्ही कुठलीही चिंता करू नका . ही नर्मदा माता आहे .हिच्या काठावरती अन्य कोणाचेही नियम चालत नाहीत . मैय्या के किनारे करोना फिरोना कुछ नही चलता ! त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे चालत रहा . संपूर्ण कोरोना काळामध्ये देखील नर्मदा परिक्रमा व्यवस्थित चालू होती आणि एकाही परिक्रमा वासीला करोना झालेला नाही हे त्यांनी मला आवर्जून सांगितले .एका डॉक्टरचा देखील नर्मदा म...