लेखांक १४ : सकरी गावचा लम्मू लाल विश्वकर्मा
डॉक्टर प्रल्हाद पटेल यांनी सांगितलेला पाच ते दहा किलोमीटर चालण्याचा नियम माझ्याकडून पाळला जात नाही याची थोडीशी खंत मनात होती .परंतु पायांना त्रास देखील होत नव्हता .तसेही महाराष्ट्रातील परिक्रमावासी इतर राज्यातील लोकांपेक्षा जास्त अंतर चालतात असा इथल्या स्थानिक लोकांचा अनुभव आहे .महाराष्ट्रामध्ये असलेल्या दऱ्याखोऱ्या हे त्याचे कारण असावे .या दऱ्याखोऱ्या किल्ल्यांवर भटकणाऱ्या पायांना लांब अंतर तोडण्याची सवय असते .सक्री / सकरी गावापर्यंत मी न थांबता चालत राहिलो .इथे उजव्या हाताला एक विहीर आणि खूप मोठा वृक्ष होता . तिथे छोटीशी झोपडी होती . हे झोपडीवजा घर म्हणजेच लम्मूलाल विश्वकर्मा यांनी स्वतःच्या कष्टातून उभे केलेले परिक्रमावासींचे सेवा क्षेत्र आहे . अतिशय सुंदर छोटेखानी असा हा आश्रम आहे . संपूर्ण मातीने आणि शेणाने सरविलेला आश्रम अतिशय आरामदायक आणि सुखद असा आहे .दुपारी थंडगार वाटणारा हा परिसर रात्री तितकाच उबदार होऊन जातो ! छोटे दगडी जाते आपले लक्ष वेधून घेते . लम्मू लाल विश्वकर्मा यांचा आश्रम मला बराच काळ नर्मदा मातेचे दर्शन झालेले नव्हते