पोस्ट्स

siyaram baba लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक ७३ : तेली भट्याण चे महातपस्वी परमपूज्य सियाराम बाबा

इमेज
दुपारच्या वेळी बकावा गाव सोडले आणि नर्मदा मातेचा किनारा पुन्हा एकदा पकडला . काठाने चालताना खूप आनंद मिळत होता . इथे पावला पावलाला दगडांचा खच पडला होता . परंतु इथे कोणी त्याला दगड म्हणत नाहीत . तर शंकर स्वरूप म्हणून या दगडांकडे पाहिले जाते . बरेच अंतर चालल्यावर मर्दाना नावाचे गाव आले . त्या गावामध्ये मी काठाने चालत असताना एक मनुष्य नावेतून उतरला आणि माझ्याशी बोलू लागला . मी कुठून आलो कुठे चाललो आहे वगैरे चौकशी करू लागला . त्याने सांगितले की वरती लक्ष्मणदास महाराजांचा आश्रम आहे तिथे थोडी विश्रांती घेऊन मग पुढे जावे .  हरिहर कुटी आश्रम मर्दाना तो नर्मदेचा आदेश मानून मी त्याच्याबरोबर आश्रमामध्ये गेलो . आश्रम अतिशय सुंदर होता . भरपूर झाडी होती . अनेक मंदिरे होती . निवासाची उत्तम व्यवस्था होती .तिथे आधीच अवधूत फरले आणि छोटा बंगाली वगैरे येऊन बसलेले होते . सर्वजण झोपायच्या तयारीत होते . इतक्या तिथे कुठून तरी दहा-बारा छोट्या मुली प्रकट झाल्या ! मी त्या सर्वांना ओळीने नमस्कार केला ! प्रत्येकीने माझ्या डोक्यावर हा ठेवून मला आशीर्वाद दिला ! नंतर त्या मुली माझ्याशी खेळू...