पोस्ट्स

खुंटामोडी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक ८८ : खुंटामोडी , भारतातील सर्वात मोठी काठीची होळी आणि मोलगीचे भिलाशेठ

इमेज
धडगाव सोडले आणि कडक उन्हातून डांबरी रस्त्याने चालू लागलो . हा अजूनही शूलपणीच्या झाडीचाच परिसर चालू होता . उन्हाचा तडाखा प्रचंड होता . वाटेमध्ये अतिशय विरळ वस्ती आहे . कोणीही मराठी बोलत नव्हते . पूर्वी मी सांगितले त्याप्रमाणे हा तीनही राज्यांमध्ये विस्तारलेला संपूर्ण आदिवासी प्रदेश आहे . इथे अनेक स्थानिक भाषा आहेत .मध्य प्रदेशामधील हिंदी भाषा ,त्यानंतर नेमाडी बोली , शूल पाणीच्या झाडीच्या सुरुवातीला बोलली जाणारी पावरा आदिवासी लोकांची पावरी बोली , त्यांच्याहून थोडेसे मागास अथवा दुय्यम मानले जाणारे भील आदिवासी आहेत त्यांची भील अथवा भिलोरी बोली आहे . पावरा आणि भील यांच्यात रोटीबोटी व्यवहार सहसा होत नाहीत . (ही सर्व मला स्थानिक लोकांनी दिलेली माहिती मी लिहीत आहे . यात माझे स्वतःचे काहीही नाही . वस्तुस्थिती मांडणे हे माझे कर्तव्य आहे . ) पावरा आदिवासींचे प्राबल्य मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र या तीनही राज्यांच्या सीमांवर आहे . धडगाव पासून अक्कलकुवा पर्यंत कमी उंचीचा डोंगराळ प्रदेश आहे इथे भिल्ल लोक जास्त राहतात त्यामुळे भिलोरी भाषा जास्त चालते . भिलट नावाची अजून एक बोली आहे असे मला सांगण्...