पोस्ट्स

कोल्हा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक १७ : कोल्ह्याने शिकविलेला धडा

इमेज
गेले तीन दिवस मी सरासरी १८ ते २२ किलोमीटर चालत होतो .डॉक्टर प्रल्हाद पटेल म्हणाले त्याप्रमाणे हळूहळू माझे पाय बोलू लागले . सुरुवातीचे काही दिवस केवळ पाच ते दहा किलोमीटर चालण्याचा सल्ला मी मनावर घेतलेला नव्हता . त्यामुळे दुसऱ्या दिवशी पहाटे निघालो खरा परंतु माझे पाय खूपच दुखू लागले .पाय दुखू लागले की मी थोडासा एका कडेला उभा राहून थांबायचो आणि थंडी भरून आली की पुन्हा चालायला लागायचो . असा थांबत थांबत मी निघालो होतो . माझ्या मागचे सर्व परिक्रमावासी झपाझप पुढे निघून गेले . ते कसे काय इतक्या गतीने चालत आहेत हेच मला कळत नव्हते . आपल्याकडून काही परिक्रमा पूर्ण होणार नाही असे वाटू लागले . एक क्षणभर असाही विचार मनात आला की आता आपण नर्मदेचे दर्शन घेतलेले आहे . नर्मदेच्या काठी चार पावले चाललो सुद्धा आहे तरी चला घरी परत जाऊया ! अशा सर्व नकारात्मक विचारांनी मनामध्ये गर्दी केलेली असताना अचानक उजवीकडून धावतच एक सुंदर असा कोल्हा माझ्यासमोर आला .आणि माझ्याबरोबर समोर येऊन दचकून थांबला . याची पूर्ण वाढ झालेली नव्हती हे कदाचित कोल्ह्याचे पिल्लू असावे व ती मादी असावी .अतिशय सुंदर असा तो कोल्हा ...