पोस्ट्स

श्रीयंत्र लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक ९८ : अक्कलकोट स्वामींच्या पादुका आणि नानी पनौती मोटी पनौती

इमेज
सेहराव सोडून काठाकाठाने चालू लागलो . सुंदर असे वळण घेत नर्मदा मैया इथे डावीकडे वळते . त्यामुळे वाळूचा मोठा किनारा लाभतो . परंतु त्यापूर्वी काही पुरातन मंदिरा लागली त्यांचे दर्शन करत करत पुढे गेलो . एक सुंदर मूर्ती असलेले राम जानकी मंदिर होते मंदिराचा परिसर विस्तीर्ण आणि चांगल्या पद्धतीने लिपाई पुताई करून ठेवलेला आहे . शेणाने सारविण्याचे काम चालू असतानाचे संग्रहित छायाचित्र . या भागातील जलजीवन खूप सुंदर होते . मगरींची संख्या प्रचंड असल्यामुळे इथे मानवी हस्तक्षेप कमीत कमी होता . त्यामुळे माशांची संख्या चांगली होती . आणि मासे खाऊन जगणाऱ्या पक्षांची संख्या देखील चांगली होती . ज्याप्रमाणे एक वाघ आल्यावर जंगलाचे आरोग्य सुधारते अगदी त्याचप्रमाणे एक मगर पाण्यात आली तरी संपूर्ण जलजीवन सुरळीत होऊन जाते . रात्री मगरींच्या डरकाळ्या ऐकल्या होत्या . म्हशीचे रेकणे आणि डुकराचे  डुरकणे याच्या मधला तो आवाज होता . तो आवाज पक्का कानात बसला . डावीकडे चांगली झाडी होती आणि उजवीकडे समोर वाळूचा किनारा होता .  इथून थोडेसे पुढे गेल्यावरती एक केवट भेटला . असे कोणीही स्थानिक ग्रामस...