पोस्ट्स

शनी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ९८ : अक्कलकोट स्वामींच्या पादुका आणि नानी पनौती मोटी पनौती

इमेज
सेहराव सोडून काठाकाठाने चालू लागलो . सुंदर असे वळण घेत नर्मदा मैया इथे डावीकडे वळते . त्यामुळे वाळूचा मोठा किनारा लाभतो . परंतु त्यापूर्वी काही पुरातन मंदिरा लागली त्यांचे दर्शन करत करत पुढे गेलो . एक सुंदर मूर्ती असलेले राम जानकी मंदिर होते मंदिराचा परिसर विस्तीर्ण आणि चांगल्या पद्धतीने लिपाई पुताई करून ठेवलेला आहे . शेणाने सारविण्याचे काम चालू असतानाचे संग्रहित छायाचित्र . या भागातील जलजीवन खूप सुंदर होते . मगरींची संख्या प्रचंड असल्यामुळे इथे मानवी हस्तक्षेप कमीत कमी होता . त्यामुळे माशांची संख्या चांगली होती . आणि मासे खाऊन जगणाऱ्या पक्षांची संख्या देखील चांगली होती . ज्याप्रमाणे एक वाघ आल्यावर जंगलाचे आरोग्य सुधारते अगदी त्याचप्रमाणे एक मगर पाण्यात आली तरी संपूर्ण जलजीवन सुरळीत होऊन जाते . रात्री मगरींच्या डरकाळ्या ऐकल्या होत्या . म्हशीचे रेकणे आणि डुकराचे  डुरकणे याच्या मधला तो आवाज होता . तो आवाज पक्का कानात बसला . डावीकडे चांगली झाडी होती आणि उजवीकडे समोर वाळूचा किनारा होता .  इथून थोडेसे पुढे गेल्यावरती एक केवट भेटला . असे कोणीही स्थानिक ग्रामस्थ भेटले