पोस्ट्स

स्वामी देव लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक १३८ : काली बावडीच्या बडी छितरी आश्रमातली आम्रानुभव !

इमेज
खुजावापासून नर्मदा मैया चा किनारा सुटला . आता रस्त्याने चालत चाळीस किलोमीटर दूर असलेल्या मांडवगडापर्यंत जायचे होते .या परिसरामध्ये यवन खूप मोठ्या संख्येने होते .जाणवण्या इतपत त्यांची संख्या आणि व्यावसायिक प्राबल्य होते .इथे एक धरमकाटा होता , त्यावर वजन करायचे ठरवले . ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो की धरम काटा म्हणजे सामानासहित , भरलेल्या मालासहित ट्रकचे वजन करणारा एक मोठा वजनकाटा असतो . एक मोठा लोखंडाचा रॅम्प असतो ज्यावर ट्रक उभा करायचा असतो . आणि डिजिटल काट्यावर तुमचे वजन कळते . या का  या काट्यावर खरे म्हणजे माणसाचे वजन करू नये . परंतु तरीदेखील दहा किलो पर्यंत अचूकता याच्यामध्ये येते . याचा अर्थ आलेल्या वजनापेक्षा दहा किलो कमी किंवा दहा किलो जास्त इतकाच फरक राहतो . धरम काट्यावर माझे वजन सामानासह १२० किलो भरले ! परिक्रमेला सुरुवात केली तेव्हा सामानासह माझे वजन १०० किलो भरले होते आणि पुढे ते ९० किलो झाले होते परंतु धनुष्यबाण आणि सोबत असलेले नर्मदा मैया मधील बाण यांच्यामुळे पुन्हा एकदा वजन १२० ला टेकले ! अर्थात माझे वजन कमी कमीच होत चालले होते परंतु पाठीवरील भार मात्र प्रचं...