पोस्ट्स

Shankar maharaj लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ३ : चोराची धन

इमेज
मनोमन अशी इच्छा मी करीत होती की या मार्गशीर्ष महिन्यामध्ये (डिसेंबर २०२१ ) कुठल्याही परिस्थितीमध्ये परिक्रमा उचलायचीच ! जोपर्यंत आपण नर्मदा परिक्रमा करत नाही तोपर्यंत आपल्याला स्वतःच्या इच्छेने वागण्याची खूप सवय झालेली असते ! एकदा नर्मदा परिक्रमा झाली की आपल्या सर्व इच्छा आकांक्षा नष्ट होऊन जातात आणि केवळ देवाच्या इच्छेने वर्तावे ।देव करील ते मानावे । मग सहजची स्वभावे । कृपाळू देव ॥ या समर्थ उक्तीप्रमाणे वागण्याची सवय अंगी बाणते ! तसेच काहीसे घडले . परिक्रमेची इच्छा केली तर होती परंतु अचानक अमरावतीच्या शंकर महाराजांचा पुणे दौरा ठरला . पुण्यामध्ये धनकवडी येथे शंकर महाराजांची समाधी आहे .यांची देखील एक जबरदस्त अनुभूती मला परिक्रमे दरम्यान आली ती योग्य वेळी सांगतो परंतु हे शंकर महाराज निराळे आणि मी उल्लेख करतो आहे ते शंकर महाराज निराळे . मी उल्लेख करतो आहे ते शंकर महाराज अजून देहामध्ये आहेत . शंकर बाबांचा हा ऐतिहासिक दौरा होता ज्यामध्ये ते भक्तांच्या नियोजनानुसार हेलिकॉप्टरने पंढरपूरला गेले व तेथील नवीन आश्रमाचे उद्घाटन करून हेलिकॉप्टरने पुण्याला आले व पुन्हा हेलिकॉप्टरने पिंपळखुट्याला परत