पोस्ट्स

सदानंद गिरी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक ८ : जो तेरा संकल्प वही मेरा संकल्प

इमेज
क्षौर करून मी निघालो आणि सदानंद गिरी बाबांकडून पुढील आदेश येण्याची वाट पाहू लागलो .  क्षौर केल्यावरचे प्रस्तुत लेखकाचे रुप काहीसे असे होते  वाटेमध्ये मला शिवशंकर तिवारी नावाचा एक अत्यंत तेजस्वी आणि सज्जन पुजारी भेटला . जो मोटरसायकल वरून जाता जाता वाटेत जमलेल्या माकडांना केळी खाऊ घालत होता .त्याच्याशी बोलल्यावर असे लक्षात आले की तो रोज हे काम करतो .मारुतीरायाची सेवा समजून माकडांना केळी खाऊ घालतो . लोक देखील त्याला सहकार्य करतात , कारण त्यांनी केळी खाऊ घातल्यामुळे पोट भरलेली माकडे दिवसभर गावांमध्ये फिरून कोणाला त्रास देत नाहीत .  त्याच्याकडून संकल्प सोडावा अशी माझ्या मनात इच्छा होती परंतु नर्मदेच्या काठी आपण आपल्या इच्छा गुंडाळून ठेवायचे असतात हे मला अजून माहिती नव्हते . मी शिवशंकर तिवारी पुजारी यांच्याशी बोलत असताना एक हुशार तरुण मुलगा तिथे आला व माझी आणि पंडितजींची परीक्षा घेऊ लागला . त्याचे प्रश्न देखील मजेशीर होते परंतु मूलगामी होते . सुमारे तास दीड तास आमच्या तिघांचा शास्त्रार्थ चालला होता .त्यांची विद्वत्ता , साधेपणा आणि नम्रता माझ्या मनाला खूप...