पोस्ट्स

मृत्युंजय आश्रम लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक २७ : नर्मदेचे उगमस्थान श्री क्षेत्र अमरकंटक

इमेज
मीरा माईंचे दर्शन घेतल्यानंतर मी सोबतच्या सर्वांना सांगितले की त्यांनी कृपया पुढे निघून जावे कारण मला एकट्याने चालायचे आहे .माझ्या विनंतीला मान देत सर्वजण पुढे निघून गेले आणि मी थोडा वेळ नर्मदा मातेचे ते बालरूप न्याहाळत बसलो . माझा अजूनही डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता कारण इतकी लहान नर्मदा माता मी कधी पाहिलीच नव्हती ! काही ठिकाणी तर तिचे पात्र केवळ एक ते दीड फूट रुंदीचे होते .काठावरून जाताना तोल गेला तरी मनुष्य पलीकडे जाईल इतके सहज सोपे !  बालरूपातील नर्मदा मैया होय ,हा छोटासा झरा म्हणजे नर्मदा नदीच आहे ! इथे घनदाट अरण्य होते आणि झाडी खूप उंच व सदाहरित वाटत होती . इथे मला रस्त्याच्या कडेला टाकळा या झुडुपाची खूप सारी झाडे दिसली व भरपूर बिया देखील मिळाल्या .  नर्मदा नदीला समांतर असा एक रस्ता अमरकंटक पर्यंत गेलेला आहे . तो रस्ता धरून मी अमरकंटकची दिशा पकडली . मध्ये स्वामी विवेकानंदांचे एक केंद्र लागले . श्री रामकृष्ण कुटीर असे त्याचे नाव आहे .  इथे आत रामकृष्णांचे मंदिर आहे . स्वामी विवेकानंदा...