पोस्ट्स

जमुना पटेल लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक ११ : पहिला मुक्काम

इमेज
पहिलेच भोजन घेऊन तनमन तृप्त झाले ,तिथेच मुक्काम करा असा आग्रह घरातील लोक करत होते परंतु मी मनोमन असे ठरविले होते की या परिक्रमे दरम्यान आपल्या देहाचे कमीत कमी चोचले पुरवायचे , तसेही मी सात आठ किलोमीटरच चाललो होतो सकाळपासून. अजून चालता येईल असे वाटले आणि मी भर उन्हामध्ये सामान उचलले . पुढे बरेला नावाचे गाव लागले . तिथे जमुना पटेल नावाचा एकाच डोळ्याने डोळस असलेला एक चहावाला भेटला . हा गावामध्ये संघाची शाखा लावत असे . त्याच्या आग्रहाखातर सुंदर असा चहा पिऊन पुढे चालू लागलो   जमुना पटेलने एक सेल्फी काढला व मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला . तो क्षण परिक्रमेच्या अगदी सुरुवातीला प्रस्तुत लेखकाचा स्वच्छ आणि वजनदार अवतार . सौजन्य जमुना पटेल . माझे कपडे नवे कोरे होते आणि क्षौर केलेले होते त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना कळत होते की हा नवीन परिक्रमा वाशी आहे .लोक कुतूहलाने थांबवत , नर्मदे हर चा पुकारा देत आणि चौकशी करत . कहा से हो बाबाजी ? क्या करते हो ? क्यू उठाई परिक्रमा ? वगैरे वगैरे .नर्मदा खंडातील लोकांनी गेल्या अनेक वर्षात इतके परिक्रमा...