पोस्ट्स

gwari ghat लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक ७ : नाभिकाने केलेला जाहीर __मान !

इमेज
आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये क्षौर करणे याला फार महत्त्व आहे . कारण मनुष्य कसा दिसणार हे बव्हंशी आपल्या केशरचनेवर अवलंबून असते . केस विस्कटलेला मनुष्य अस्ताव्यस्त दिसतो व केसांची निगा राखणारा मनुष्य सुस्वरूप दिसतो हे उघड सत्य आहे . त्यामुळे जन्मापासून माणसाचे आपल्या केसांवर फार प्रेम असते . त्यामुळे आपल्या जवळ असलेल्या मायेचे प्रकट स्वरूप म्हणून केसांकडे पाहिले जाते व मायेचा त्याग याचे प्रतीक म्हणून सर्वप्रथम केसांचा त्याग केला जातो .  परिक्रमेदरम्यान पुन्हा केस व नखे यांना हात लावायला परवानगी नसते . परिक्रमा पूर्ण होईपर्यंत नखे व केस यांची मुक्त वाढ होऊ द्यायची असते .भारतात सर्वत्र ही प्रथा दिसते . अगदी दक्षिण भारतातील अय्यप्पाची यात्रा करणारे लोक किंवा आंध्रात श्रीशैल्यम मल्लीकार्जुनाचे महाशिवरात्र व्रत करणारे देखील ही प्रथा महिनाभर पाळतात . मी घाटावरती गेलो .अभिषेक त्रिपाठी नामक एका ब्राह्मणाने मला बोलावले व काय हवे विचारले .मी केश कर्तन करावयाचे आहे हे सांगितल्यावर त्याने शेजारून चाललेल्या राम लखन सेन नामक नाभिकाला हाक मारली व त्याचे सोबत मला पाठविले . माझ्या शहरी ...