पोस्ट्स

गौर नदी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक १० : या स्वामी जेवायला !

इमेज
पोटात अन्न सरकले आणि पायांनी चांगली गती घेतली . महामार्गाने जाताना दुचाकीवरून एकाने थांबून दक्षिणा दिली आणि माझा फोटो काढला . तो हा फोटो . नवे कोरे बूट होते ,स्वच्छ डांबरी रस्ता होता , पहिलाच दिवस होता त्यामुळे कुठली इजा वगैरे पायाला झाली नव्हती अथवा वेदनाही नव्हती , झपाझप चालण्यासाठी अनुकूल अशीच ही परिस्थिती होती . त्यामुळे गतीने चालू लागलो . परंतु अजून सुद्धा मला नक्की चालावे कुठल्या गतीने हे कळत नव्हते .फार वेगाने चालले तर पुढे कधीतरी पाय दुखण्याची शक्यता होती .पायाला एखादी इजा झाली एखादा स्नायू ओढला गेला किंवा लिगामेंट वगैरे दुखावले तर सगळाच खेळ थांबणार होता .तेच जर हळूहळू चाललो तर वेळ वाढणार होता आणि पायांवर अधिक भार पडणार होता .मनात हा प्रश्न पडताक्षणी नर्मदा मातेचे स्मरण केले आणि तिला म्हणालो की मला मार्गदर्शन कर की माझे पाऊल किती लांबीचे असावे .ज्याला इंग्रजीमध्ये स्ट्राइड असे म्हणतात . एका पावलाची झेप .ऐकून तुम्हाला हे सर्व मजेशीर वाटू शकते परंतु तीन हजार सहाशे किलोमीटर चालायचे असेल तर तुम्ही तुमच्या चालण्याच्या सवयी मध्ये केलेला एक छोटासा बदल सुद्धा शेकडो किलोमीटर