पोस्ट्स

ग्वारा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक १५ : अखंड भारताचे नाभीस्थान !

इमेज
शिक्का मारून घेतला आणि बंजारा मातेचे मंदिर सोडले .मुसरा नदी ओलांडून हरदौली , ग्वारा , भलवारा , हाथीतारा , गुंदलई अशी अनेक गावे सोडली . परंतु गावातील एकही गोंड आदिवासी व्यक्ती नर्मदे हर म्हणत नव्हती ! चहा पाण्यासाठी किंवा भोजनासाठी बोलवणे तर फार लांबची गोष्ट . भुकेने जीव कासावीस झाला . हा संपूर्ण परिसर म्हणजे डोंगर उतारावरील जंगल संपून , डोंगराच्या माथ्यावरील एक मोठा औरस चैरस पसरलेला माळ होता . याला सात पहाडी माळ असे सुद्धा म्हणतात . या संपूर्ण भागामध्ये पाण्याची पातळी आश्चर्यकारक रित्या अधिक होती . रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्याशा खड्ड्यांमध्ये देखील पाणी साठलेले दिसायचे . या भागातून भारतातील बऱ्याच नद्यांचा उगम होतो .चालता चालता अनेक छोटे छोटे ओढे , नाले ,नद्या , जलस्रोत मी ओलांडत होतो . सर्वत्र ओसाड माळरान होते . पाणी मुबलक होते परंतु मोठी झाडे नव्हती असे विचित्र वातावरण पाहिले . इथे शेती फक्त निलगिरीच्या झाडांची केली जायची . इथले काही ग्रामस्थ मोठे मजेशीर असतात . पुढे कुठले गाव आहे असे विचारल्यावर एक खेडूत मला म्हणाला आगे एलिफंट स्टार व्हिलेज है ! नंतर कळाले की पुढील गावाचे नाव ह...