पोस्ट्स

शूलपाणी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक १३० : अट्ठयाच्या जंगलातला हल्ला , सेवाभावी भावसिंह अवलसिंह वास्केला आणि साकडीचा मेंगला पैरान सस्तिया

इमेज
मध्यप्रदेशातल्या अलीराजपुर जिल्ह्यातल्या सोंडवा तालुक्यातले मथवाड गाव सोडले आणि उन्हाचा दाह जाणवू लागला . सकाळी सात वाजल्यानंतर उन्हाचे चटके बसू लागायचे . चालताना नको नको व्हायचे ! दक्षिण तटावरून चालताना सूर्य सकाळी पाठीशी असायचा . उत्तर तटावर तर सूर्याची उन्हे थेट डोळ्यावर यायची ! दक्षिण तटावर सूर्य जणू काही सांगायचा ! चालत रहा मी तुझ्या पाठीशी आहे ! मानेला भयानक चटके बसायचे . त्यामुळे गळ्यातला रुमाल मानेवर झाकून घ्यायचो . उत्तर तटावर मात्र सूर्य सतत समोर असायचा . त्यामुळे डोळ्याला अंधारी यायची . देहाकडे लक्ष नव्हतेच . पण लक्ष गेल्यावर लक्षात यायचे की आपला रंग आयुष्यात कधी नव्हे इतका काळवंडला आहे. म्हणजे आरशात बघायची संधी कधी मिळत नसे परंतु हाताच्या रंगावरून लक्षात यायचे . यालाच म्हणतात तापणे किंवा तप घडणे ! मैया परिक्रमावासीला रताळ्यासारखी भाजून उकडून काढते ! आधी ताप ताप तापायचे ! आणि मग अचानक मैया मध्ये बुडायचे ! सगळेच टोकाचे ! पण तीच सहनशक्ती देते . तीच तुम्हाला बळ देते . तीच तुमची रक्षणकर्ती असते . आपल्याला फक्त या गोष्टीचा विसर पडू द्यायचा नसतो . आज एक असा प्रसंग आला की मला क्षणभ...