पोस्ट्स

मोहीपुरा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ७७ : बुराड संगम ,देव संगम, कपिला संगम लोहारा आणि नाहिली संगमी सहस्त्रयज्ञाख्य तीर्थ मोहीपुरा

इमेज
ग्यारहलिंगी आश्रमातून भल्या पहाटे मी निघालो खरा . परंतु अशा रीतीने अंधारामध्ये बाहेर पडणे परिक्रमेच्या नियमात बसणारे नाही . त्यामुळे त्याचे बसायचे ते सर्व फटके मला बसले ! वाटेमध्ये मला प्रचंड वन्यजीव भेटले . अनेक कोल्हे मला आडवे गेले . मोठे घुबड पाहिले . अंधारात अज्ञात जनावरे पळण्याचे आवाज ऐकले . पाण्यातून दोन खोल ओढे ओलांडताना माझ्या मनाची अवस्था काय झाली होती ही माझी मलाच माहिती ! त्यात ओढे ओलांडून भिजल्यामुळे पुढे चालताना अखंड थंडी वाजू लागली . अजूनही झाडी कमी झाली नव्हती .अंधुक दिसू लागले होते .   ग्यारह लिंगी आश्रम सोडून काठाकाठाने पुढे निघाल्यावर डावीकडे अशी घनदाट झाडी आहे . नर्मदा मैया जिथे जमिनीला स्पर्श करते तिथून चाललात तरच चालण्यापूर्ती जागा मिळते अन्यथा चालता येत नाही . परंतु नर्मदेच्या कृपेने मला प्रत्येक वेळी एक पाऊल ठेवण्या पुरती तरी जागा मिळाली . आपण वरून खाली चालत आहोत . हेच ते दोन ओढे जे मी अंधारात पाण्यामध्ये उतरून पार केले . मला असे वेडे साहस करायची इच्छा त्यादिवशी का झाली माहिती नाही . परंतु हे परिक्रमेच्या नियमात बसणारे नाही .तरी कृपया अन्य