पोस्ट्स

मंडलेश्वर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक १४३ : टेंबे स्वामी आणि गोंदवलेकर महाराजांच्या स्मृतीने पावन मंडणमिश्रांचे मंडलेश्वर आणि जगातले पहिले शिवलिंग गुप्तेश्वर

इमेज
काठा काठाने चालताना खडक संपला आणि मऊ माती सुरू झाली . एखादे मोठे शहर जवळ आल्याच्या खुणा दिसू लागल्या . दुर्दैवाने या सर्व खुणा अतिशय वाईट आणि निंदनीय अशा आहेत . सर्वप्रथम माशा घोंगावू लागल्या . तदनंतर प्लास्टिकचा कचरा दिसू लागला . नर्मदा मातेच्या पाण्याचा प्रवाह दूषित भासू लागला . थोड्याच वेळात अतिशय घाणेरडे पाणी थेट मैया मध्ये नेऊन टाकणारे नाले आडवे येऊ लागले . त्यातच पाणी उपसणारी डोहकुपे बांधलेली दिसत होती . नक्की कुठले पाणी हे लोक पीत होते काय माहिती ! कसेबसे ते घाणेरडे नाले पार केल्यावर एक छोटासा रस्ता लागला . हे मंडलेश्वर नावाचे गाव होते . महेश्वर मंडलेश्वर ही तशी जोड गोळी . मंडलेश्वर म्हणजे प्राचीन महेष्मती नगरी ची मंडल गल्ली होती असे म्हणतात . आद्य शंकराचार्य जेव्हा धर्मप्रसारासाठी बाहेर पडले होते तेव्हा त्यांना आपल्या बुद्धी सामर्थ्याने आणि युक्तिवादाने जेरीला आणणारे मंडण मिश्रा आणि त्यांची पत्नी भारती मिश्रा यांचे हे गाव .अर्थातच शंकराचार्य हा शास्त्रार्थ जिंकले होते . आणिआज आपण कुंभमेळा किंवा पंचदशनामी आखाडे वगैरे जे काही पाहतो त्याची सुरुवात या शास्त्रार्थानंतरच झाली होती . ...