पोस्ट्स

तत्कालेश्वर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक १४२ : जालेश्वर कालेश्वर आणि परशुरामाने परशु धुतला त्या लाडवी चा तत्कालेश्वर

इमेज
महेश्वर चा घाट सोडला तरी त्याचे गारुड मनावर कायम होते ! आणि कायम राहील ! जगातील उत्तम उदात्त उन्नत सुंदर गोष्टींचे असेच असते ! त्या लवकर तुमच्या विस्मरणामध्ये जाऊ शकत नाहीत ! त्या समजून घेण्यासाठी मेंदूचे अधिकाधिक भाग वापरले गेलेले असतात ! त्यामुळे त्यांचा ठसा देखील मेंदूमध्ये खोलवर उमटलेला असतो .  महेश्वर घाटावरून निघाल्यावर काशी विश्वनाथा चे दर्शन घेतले . हा घाट देखील सुंदर व सुबक होता . मंदिराचे सोनेरी खांब दुरून छान दिसायचे . इथे अनेक छोटे मोठे देव आणि मंदिरे आहेत . न कंटाळता सर्वांची दर्शने घेतली . नर्मदा परिक्रमेसाठी आपण जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा किंवा एकंदरीतच आयुष्यात सर्व वेळ केवळ आणि केवळ वर्तमान काळातच जगावे असे मला वाटते . नाहीतर घरात बसलेले असताना परिक्रमेला जाण्याची घाई आणि परिक्रमेला आल्यावर घरी परतण्याची घाई असे करू नये . आपण काही रोज रोज नर्मदा परिक्रमा करत नाही . त्यामुळे वाटेमध्ये येणारी मंदिरे ही काही आपल्याला सतत दिसणार नसतात . त्यामुळे कितीही पुनरावृत्ती झाली आणि कितीही कंटाळा आला तरी प्रत्येक मंदिरामध्ये जावे आणि दोन हस्तक तिसरे मस्तक आवर्जून जोडावे . प्रत्...