पोस्ट्स

कोठिया घाट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ४९ : कचरा प्रज्वलित करून केलेली मैय्याची आरती अन् कोठीया घाट चे फलाहारी जगजीवनदास महाराज

इमेज
लिंगा घाट येथील आश्रम अगदी नर्मदेच्या किनारी आहे . सुख चैन नावाची नदी पार केली . नदी बऱ्यापैकी आटत आलेली होती . आश्रमाच्या सुबक ठेंगण्या महाद्वारापाशी आलो  लिंगा घाटापूर्वीची चाल लिंगा घाट मंदिराचे प्रवेशद्वार अतिशय सुंदर आहे . लिंगा घाट आश्रमाचा परिसर इथे एक विदेही बाबा अन्नक्षेत्र चालवितात . त्यांच्या शिष्याने आस्थेने मला बसवून घेतले आणि स्वयंपाकाला लागला . इतक्यात तिथे चार-पाच परिक्रमा वासी आले .याच्यामध्ये वापी इथला अवधूत फरले होता .ज्याने मगाशी माझा व्हिडिओ घेतला होता . त्याच्यासोबत बापू दादा आणि बंगाली बाबू असे तिघेजण होते . बापू म्हणजे गुजरात मधला एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता होता . दादा म्हणून एक आजोबा होते . आणि सात्यकी रॉय नावाचा एक गोड बंगाली मुलगा होता . हा वर वर पाहता अतिशय नम्र आणि गुणवान वाटायचा ! परंतु त्याच्यासोबत थोडा वेळ घालवल्यावर तो काय प्रकार आहे ते लक्षात यायचे . बंगालमध्ये सर्वत्र मुबलक आढळणाऱ्या डाव्या चळवळीचा प्रभाव याच्या मेंदूवर स्वाभाविकपणे होता . त्यामुळे तो परिक्रमेमध्ये असून देखील परिक्रमेमध्ये नव्हता . म्ह