पोस्ट्स

डॉक्टर प्रल्हाद पटेल लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक १२ : वेश धरावा बावळा

इमेज
परिक्रमेच्या पहिल्याच दिवशी मी सुमारे १८ ते २० किलोमीटर पायी चाललो होतो ! हा आकडा खरे तर आश्वासक होता परंतु नर्मदा मातेच्या मनात काहीतरी वेगळेच होते . सकाळी थंडी जास्त असल्यामुळे तुम्ही कितीही वेगाने चालले तरी तुम्हाला फारसा घाम येत नाही . किंवा जरी घाम आला तरी थंड वातावरण असल्यामुळे तो सुखद असतो . हा संपूर्ण परिसर थंडीसाठी प्रसिद्ध होता . माझे हात अक्षरशः गोठून जात होते . माझ्या दंडाला (काठीला )दोन्ही बाजूंनी असलेले धातूंचे गठ्ठू अक्षरशः बर्फासारखे गार पडत . वेताचा दंड देखील खूप गार पडायचा . एकदा त्याला जिथे पकडले तिथेच धरून ठेवावे लागायचे . हात जरा देखील वर खाली केला की हाताला गार लागायचे . माझ्याकडे हातमोजे ,कान टोपी , मफलर ,स्वेटर वगैरे काहीच नव्हते . परंतु छाटी हे जे वस्त्र मी घालायचो त्यात छातीवरती कापडाचे दोन पदर येतात त्यामुळे छातीला थंडी कमी वाजायची . मला या छाटी वस्त्राची पूर्वीपासून सवय आहे . आपली छाती आणि कान गरम राहिले की थंडी फारशी वाजत नाही हे सूत्र लक्षात ठेवावे .     हेळवाक घळ येथे छाटी आणि उपरणे (उपवस्त्र) घालून प्रस्तुत लेखक ( महाविद्यालयीन जीवनात ) छाटी