पोस्ट्स

बरगाव लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक १८ : मुंडा महारण्यामध्ये प्रवेश

इमेज
शहापूरा पासूनच्या पुढच्या वन प्रदेशाला मुंडा महारण्य असे नाव आहे . फार पूर्वी इथे अतिशय घनदाट अरण्य होते आता विरळ झाडी शिल्लक आहे . जंगलातून चालता चालता एक छोटासा घाट लागला .मला हळूहळू आता भुकेची जाणीव होऊ लागली . घाटामध्ये डाव्या हाताला खाली एक छोटीशी कुटी दिसली .आतून एका बाबांनी आवाज दिला .                        बंजरकुटी आश्रम  छीहार बाबांची शिष्य चेतराम बाबाजी म्हणून इथे राहत होते . या आश्रमाला बंजर कुटी (वनचर कुटी) म्हणत . काळ्या रंगाचा गॉगल आणि काळे कपडे घातलेले बाबांचे फोटो आश्रमात लावलेले होते . इथे खाली एक छोटासा झरा होता . एक-दोन छोटी मंदिरे  होती. सकाळचे नऊ वाजले असावेत . बाबा मला म्हणाले भोजन प्रसाद घेऊन पुढे जा .मी म्हणालो मला अजून बरेच चालायचे आहे तरी काही बालभोग असेल तर घेतो .अल्पोपाहार किंवा नाश्ता याला परिक्रमेच्या अथवा साधूंच्या भाषेमध्ये बालभोग असे म्हणतात .याने जंगलामध्ये उगवणाऱ्या कुदै नावाच्या धान्याची अप्रतिम खिचडी मला बालभोग म्हणून चारली .ही खिचडी इतकी चविष्ट होती आणि इतकी अप्रतिम ताकद त्याच्यामध्ये होते की पुढे दिवसभर मला भूकच लागली नाही