पोस्ट्स

मंडला लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक १५ : अखंड भारताचे नाभीस्थान !

इमेज
शिक्का मारून घेतला आणि बंजारा मातेचे मंदिर सोडले .मुसरा नदी ओलांडून हरदौली , ग्वारा , भलवारा , हाथीतारा , गुंदलई अशी अनेक गावे सोडली . परंतु गावातील एकही गोंड आदिवासी व्यक्ती नर्मदे हर म्हणत नव्हती ! चहा पाण्यासाठी किंवा भोजनासाठी बोलवणे तर फार लांबची गोष्ट . भुकेने जीव कासावीस झाला . हा संपूर्ण परिसर म्हणजे डोंगर उतारावरील जंगल संपून , डोंगराच्या माथ्यावरील एक मोठा औरस चैरस पसरलेला माळ होता . याला सात पहाडी माळ असे सुद्धा म्हणतात . या संपूर्ण भागामध्ये पाण्याची पातळी आश्चर्यकारक रित्या अधिक होती . रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्याशा खड्ड्यांमध्ये देखील पाणी साठलेले दिसायचे . या भागातून भारतातील बऱ्याच नद्यांचा उगम होतो .चालता चालता अनेक छोटे छोटे ओढे , नाले ,नद्या , जलस्रोत मी ओलांडत होतो . सर्वत्र ओसाड माळरान होते . पाणी मुबलक होते परंतु मोठी झाडे नव्हती असे विचित्र वातावरण पाहिले . इथे शेती फक्त निलगिरीच्या झाडांची केली जायची . इथले काही ग्रामस्थ मोठे मजेशीर असतात . पुढे कुठले गाव आहे असे विचारल्यावर एक खेडूत मला म्हणाला आगे एलिफंट स्टार व्हिलेज है ! नंतर कळाले की पुढील गावाचे नाव ह