लेखांक २८ : अमरकंटकचे गीता स्वाध्याय मंदिर
सोनमूढा सोडल्यावर वाटेत एकाने सांगितले की पुढे पुष्कर बंधाऱ्या पाशी यशोधन नावाचे पुण्याचे कोणीतरी अन्नछत्र चालवितात तिथे जावे . चालता चालता हळूहळू अमरकंटक गाव दिसू लागले . लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे रस्त्यावर फारशी गर्दी नव्हतीच . पुष्कर बंधाऱ्यावरील या आश्रमाची कोणाला माहिती आहे का हे विचारण्याकरता मी जागा शोधत होतो . एका छोट्याशा आश्रमाचे लोखंडी दार मला दिसले .दारावरती श्री गीता स्वाध्याय मंदिर अशी अक्षरे लोखंडामध्येच घडवलेली होती . तिथून आत उन्हामध्ये खुर्ची टाकून एक वयस्कर संन्यासी बसल्याचे माझ्या लक्षात आले . त्यांची समाधी अवस्था लागलेली दिसत होती . मी बराच वेळ त्या लोखंडी दाराच्या बाहेर हात जोडून उभा राहिलो . संन्यासी महाराजांची मूर्ती अतिशय छोटीशी होती . त्या वामनमूर्तीचे वजन जेमतेम ३० ते ३५ किलोच असावे ! नुकतेच क्षौर केलेले होते . इतक्यात आतून कुणीतरी सेवेकरी आला आणि त्याने मला विचारले क्या चाहिये बाबा जी? सेवेकऱ्याच्या त्या आवाजामुळे संन्यासी महाराजांची समाधी भंग पावली .आणि माझ्याकडे पाहत त्यांनी अतिशय दमदार भरदार आणि खर्जातल्या आवाजात विचारले , " नर