पोस्ट्स

दतवाडा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ७८ : दतवाडा चा स्वामी प्रबुद्धानंद भारती स्थापित रम्य असा रम्या परिक्रमावासी निवास आश्रम

इमेज
त्यादिवशी मी पहाटे लवकर उठून आन्हीके आटोपून सिद्धेश्वरा समोर बसून शंकराची स्तवने म्हटली . परिक्रमावासी दांपत्यासोबत महादेवांचे आरती केली . माझी पूजा अर्चा आटोपून घेतली .      वहीमध्ये आश्रमाचा शिक्का घेतला . गावातील एक मनुष्य आम्हा तिघांना चहा पिण्याचे आमंत्रण देण्यासाठी आला होता . त्याच्यासोबत त्याचे घरी चहा पिण्यासाठी तिघेही गेलो . याने सुंदर असा चहा पाजला आणि शेतातल्या भरपूर शेंगा सोबत खायला दिल्या . गावातील राम मंदिराचे दर्शन घेतले . तिथून निघालो आणि थेट मैयाचा किनारा गाठला . थोडेसे अंतर चाललो आणि एका कोळ्यापाशी येऊन थांबलो . धरणातील पाणी कमी जास्त होत असल्यामुळे येणारी भरती ओहोटी याचा अभ्यास करून याने अशा पद्धतीने जाळे लावले होते की रात्रभर भरपूर मासे त्याच्या जाळ्यात सापडले होते . दोघे नवरा बायको मासे गोळा करायचे काम करत होते . त्यांचे ते कर्म थोडावेळ पाहत राहिलो . तडफडणारे मासे इकडे तिकडे उड्या मारत होते . क्षणभर वाटले या माशांना उचलून परत पाण्यात सोडावे . परंतु हे परिक्रमेच्या नियमात बसणारे नाही . नर्मदेच्या काठावर जे काही सुरू आहे त्यात ढवळाढवळ करण्याचे काम परिक्रम