पोस्ट्स

मोटी कोरल लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ११७ : मोटी कोरल चा पुनीत आश्रम आणि नर्मदा मातेने दिलेली " तैरती शीला "

इमेज
चालत चालत मंगलेश्वर तीर्थ मागे टाकले . आणि उजव्या हाताला दिसणारा कबीरवड पाहत पुढे चालत राहिलो . संत कबीर यांनी दातून करून अर्थात दात घासून टाकून दिलेल्या वडाच्या काडीला फुटलेला हा महावृक्ष आहे . तो एका भव्य बेटावर आहे . त्यामुळे परिक्रमा वासीना तिथे जाता येत नाही . समोरील तटावर असताना झगडिया मढीच्या इथून हाच कबीरवड दिसत होता .  कबीरवड कबीरवड मंदिराचा गाभारा (परिक्रमावासी या बेटावर जाऊ शकत नाहीत म्हणून मुद्दाम दर्शनासाठी संग्रहित फोटो टाकले आहेत ) पुढे निकोरा नावाचे गाव लागले . इथे लिंगवराहाचे पुरातन मंदिर होते . या संपूर्ण भागात वराहाचे फार महत्त्व आहे असे मला जाणवले .  लिंगवराह  मंदिर निकोरा मंदिराचे दर्शन घेऊन काठाकाठाने पुढे निघालो . पुढे गुप्तेश्वर महादेवाचे मंदिर आहे .                                 गुप्तेश्वर महादेव त्याचे दर्शन घेऊन थोडे पुढे गेल्यावर एका अति भव्यदिव्य आश्रमाने लक्ष वेधून घेतले . या आश्रमाची वास्तू इतकी भव्य दिव्य होती की ती न पाहता पुढे जाता येणे शक्यच नाही ! हा आहे निकोरा येथील ध्यानी आश्रम . श्री आनंदी मा नावाच्या एका तरुण साध्वीने आपल्या गुरुदेव