लेखांक ७ : नाभिकाने केलेला जाहीर __मान !
आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये क्षौर करणे याला फार महत्त्व आहे . कारण मनुष्य कसा दिसणार हे बव्हंशी आपल्या केशरचनेवर अवलंबून असते . केस विस्कटलेला मनुष्य अस्ताव्यस्त दिसतो व केसांची निगा राखणारा मनुष्य सुस्वरूप दिसतो हे उघड सत्य आहे . त्यामुळे जन्मापासून माणसाचे आपल्या केसांवर फार प्रेम असते . त्यामुळे आपल्या जवळ असलेल्या मायेचे प्रकट स्वरूप म्हणून केसांकडे पाहिले जाते व मायेचा त्याग याचे प्रतीक म्हणून सर्वप्रथम केसांचा त्याग केला जातो . परिक्रमेदरम्यान पुन्हा केस व नखे यांना हात लावायला परवानगी नसते . परिक्रमा पूर्ण होईपर्यंत नखे व केस यांची मुक्त वाढ होऊ द्यायची असते .भारतात सर्वत्र ही प्रथा दिसते . अगदी दक्षिण भारतातील अय्यप्पाची यात्रा करणारे लोक किंवा आंध्रात श्रीशैल्यम मल्लीकार्जुनाचे महाशिवरात्र व्रत करणारे देखील ही प्रथा महिनाभर पाळतात . मी घाटावरती गेलो .अभिषेक त्रिपाठी नामक एका ब्राह्मणाने मला बोलावले व काय हवे विचारले .मी केश कर्तन करावयाचे आहे हे सांगितल्यावर त्याने शेजारून चाललेल्या राम लखन सेन नामक नाभिकाला हाक मारली व त्याचे सोबत मला पाठविले . माझ्या शहरी मेंद