पोस्ट्स

pimpalkhuta लेबलसह पोस्ट दाखवत आहे

• लेखांक ३ : चोराची धन

इमेज
मनोमन अशी इच्छा मी करीत होती की या मार्गशीर्ष महिन्यामध्ये (डिसेंबर २०२१ ) कुठल्याही परिस्थितीमध्ये परिक्रमा उचलायचीच ! जोपर्यंत आपण नर्मदा परिक्रमा करत नाही तोपर्यंत आपल्याला स्वतःच्या इच्छेने वागण्याची खूप सवय झालेली असते ! एकदा नर्मदा परिक्रमा झाली की आपल्या सर्व इच्छा आकांक्षा नष्ट होऊन जातात आणि केवळ देवाच्या इच्छेने वर्तावे ।देव करील ते मानावे । मग सहजची स्वभावे । कृपाळू देव ॥ या समर्थ उक्तीप्रमाणे वागण्याची सवय अंगी बाणते ! तसेच काहीसे घडले . परिक्रमेची इच्छा केली तर होती परंतु अचानक अमरावतीच्या शंकर महाराजांचा पुणे दौरा ठरला . पुण्यामध्ये धनकवडी येथे शंकर महाराजांची समाधी आहे .यांची देखील एक जबरदस्त अनुभूती मला परिक्रमे दरम्यान आली ती योग्य वेळी सांगतो , परंतु हे शंकर महाराज निराळे आणि मी उल्लेख करतो आहे ते शंकर महाराज निराळे . मी उल्लेख करतो आहे ते शंकर महाराज अजूनही देहामध्ये आहेत . शंकर बाबांचा हा ऐतिहासिक दौरा होता ज्यामध्ये ते भक्तांच्या नियोजनानुसार हेलिकॉप्टरने पंढरपूरला गेले व तेथील नवीन आश्रमाचे उद्घाटन करून हेलिकॉप्टरने पुण्याला आले व पुन्हा हेलिकॉप्टरने पिंपळखुट्याला...