पोस्ट्स

मोलगी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ८८ : खुंटामोडी , भारतातील सर्वात मोठी काठीची होळी आणि मोलगीचे भिलाशेठ

इमेज
धडगाव सोडले आणि कडक उन्हातून डांबरी रस्त्याने चालू लागलो . हा अजूनही शूलपणीच्या झाडीचाच परिसर चालू होता . उन्हाचा तडाखा प्रचंड होता . वाटेमध्ये अतिशय विरळ वस्ती आहे . कोणीही मराठी बोलत नव्हते . पूर्वी मी सांगितले त्याप्रमाणे हा तीनही राज्यांमध्ये विस्तारलेला संपूर्ण आदिवासी प्रदेश आहे . इथे अनेक स्थानिक भाषा आहेत .मध्य प्रदेशामधील हिंदी भाषा ,त्यानंतर नेमाडी बोली , शूल पाणीच्या झाडीच्या सुरुवातीला बोलली जाणारी पावरा आदिवासी लोकांची पावरी बोली , त्यांच्याहून थोडेसे मागास अथवा दुय्यम मानले जाणारे भील आदिवासी आहेत त्यांची भील अथवा भिलोरी बोली आहे . पावरा आणि भील यांच्यात रोटीबोटी व्यवहार सहसा होत नाहीत . (ही सर्व मला स्थानिक लोकांनी दिलेली माहिती मी लिहीत आहे . यात माझे स्वतःचे काहीही नाही . वस्तुस्थिती मांडणे हे माझे कर्तव्य आहे . ) पावरा आदिवासींचे प्राबल्य मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र या तीनही राज्यांच्या सीमांवर आहे . धडगाव पासून अक्कलकुवा पर्यंत कमी उंचीचा डोंगराळ प्रदेश आहे इथे भिल्ल लोक जास्त राहतात त्यामुळे भिलोरी भाषा जास्त चालते . भिलट नावाची अजून एक बोली आहे असे मला सांगण्