पोस्ट्स

अश्विनी पटेल लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक ६ः झुलेलाल आश्रम , ग्वारी घाट

इमेज
ग्वारी घाटाचे महात्म्य तर तुम्हाला सांगितले .नर्मदे काठी भेटलेल्या त्या साधूने मला सांगितले , " इथे दोन चांगले आश्रम आहेत .एक धुनीवाले बाबांचा आश्रम आहे आणि दुसरा झुलेलाल आश्रम आहे . झुलेलाल आश्रमामध्ये गेलास तर तिथे एक साधू आहे . तो तुला सर्व माहिती देईल परिक्रमेची . " हा नर्मदा मातेचा आदेश मानून मी झुलेलाल आश्रमामध्ये गेलो .आश्रम अतिशय सेवाभावी वृत्तीने चालविला जातो आणि इथे नित्य परिक्रमा वासियांची ये जा सुरू असते .मुन्ना नामक एक सेवक , एक अपंग गुरुजी , अजून दोन विमनस्क माणसे आणि दोन बायका असे पाच जण मिळून सर्व डोलारा सांभाळतात .जय झुलेलाल अन्न (क्षेत्र ) , माँ नर्मदा सेवा समिती ,असे शिक्क्यावर असलेले आश्रमाचे नाव आहे .  आश्रमाचे प्रमुख असलेले स्थूल असे एक सिंधी गृहस्थ आहेत ते रोज तिथे न चुकता येतात आणि जातीने सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालतात . इथे भोजन प्रसाद घेण्यासाठी अनेक याचक भटके अनाथ अपंग बाहेर ताटकळत उभे असतात .अगदी घाटावर फिरणाऱ्या गाई सुद्धा या आश्रमाच्या बाहेर येऊन काहीतरी खायला मिळेल याची वाट पाहत उभ्या असतात . कानाला ऐकायला अतिशय विचित्र वाटेल अशा पद्ध...