पोस्ट्स

कांचनपूर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक २० : नर्मदेने खास पाठविलेला साधू

इमेज
तीन दिवस पडलेल्या पावसामुळे सर्वत्र तुफान चिखल झालेला होता . नर्मदे काठची काळीभोर चिकण माती अतिशय चिकट झाली होती .प्रत्येक पावलाला पाय रुतत होते , बूट पायातून सारखे निघत होते . मग मी सरळ बूट काढून हातात धरले आणि अनवाणी चालू लागलो . मागून एक बुढ्ढा बाबा डोक्यावरती भली मोठी पिशवी घेऊन येताना दिसला . हा बाबा कटनी चा होता .त्याचे वय पाहता मला असे वाटले की हा चिखलात घसरून पडेल वगैरे . तरी याला चालायला थोडीशी मदत करावी .असा विचार करून मी माझी चाल हळू केली परंतु हा बाबा माझ्यापेक्षा वेगवान चालणारा निघाला त्याने क्षणात मला ओलांडून पुढचा मार्ग धरला आणि इतक्या वेगाने चालू लागला की त्याला गाठता गाठता माझीच तारांबळ उडायला लागली . शेतकरी लोकांना चिखलातून पार जाण्याचा उत्तम अंदाज असतो .जीवनातील कुठल्याही संकटावर मात करण्याची जिद्द आणि महत्त्वांच्या शेतकऱ्याच्या ठायी उपजत असते . थंडी भरपूर होती आणि शेतामध्ये असलेली विविध पिके पायाला गुदगुल्या करत होती . पिकावर साठलेले दवबिंदू थंडगार पडले होते आणि चालता चालता माझी छाटी संपूर्णपणे भिजवून टाकत होते . तो थंडगार स्पर्श चालून गरम झालेल्या पायांना खूप आराम