पोस्ट्स

शेकोटी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक ३१ : जंगलात मुक्काम आणि अपरात्री आलेला अनुभव

इमेज
परस्तेने सांगितल्याप्रमाणे मी कुठे मोकळे आकाश दिसते आहे का ते शोधत चालू लागलो . परंतु ते अरण्य इतके घनदाट होते की आकाश दिसतच नव्हते . एव्हाना अंधार पडायला सुरुवात झालेली होती . अरण्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती . अखेरीस मला एक जागा सापडली जिथे मुक्काम करावा अशी आतून प्रेरणा झाली .  अमरकंटकच्या जंगलातील नर्मदा मातेचे संग्रहित चित्र आत्ता गुगल मॅप वर मी ती जागा शोधून काढली आहे , ती साधारण अशी होती . चित्रात अंधारी रेषा दिसत आहे ते नर्मदेचे पाच दहा फुटाचे पात्र आहे . ह्या घोर जंगलातून शक्यतो जाऊ नका असे नर्मदा परिक्रमा विषयक पुस्तके देखील आवर्जून सांगतात . इथे फार काही मोकळी जागा नव्हती परंतु थोडीशी सपाटी जाणवली . या भागातील झाडी इतकी दाट आहे की तुम्हाला खरोखरच आकाश दिसत नाही .डिस्कवरी चैनल वर येणाऱ्या मॅन वर्सेस वाइल्ड मध्ये बेअर ग्रील्स हा माजी इंग्लिश सैनिक जसे जंगलात मुक्काम करतो तसे काहीतरी मला करायचे होते . आता मला एखादी तात्पुरती कुटी उभी करायची होती .माझ्याकडे एक दंड होता . तेच माझे एकमेव हत्यार होते . जास्ती आवाज करून देखील चालणा...