पोस्ट्स

अट्ठा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक १३० : अट्ठयाच्या जंगलातला हल्ला , सेवाभावी भावसिंह अवलसिंह वास्केला आणि साकडीचा मेंगला पैरान सस्तिया

इमेज
(अपूर्ण ) मध्यप्रदेशातल्या अलीराजपुर जिल्ह्यातल्या सोंडवा तालुक्यातले मथवाड गाव सोडले आणि उन्हाचा दाह जाणवू लागला . सकाळी सात वाजल्यानंतर उन्हाचे चटके बसू लागायचे . चालताना नको नको व्हायचे ! दक्षिण तटावरून चालताना सूर्य सकाळी पाठीशी असायचा . उत्तर तटावर तर सूर्याची उन्हे थेट डोळ्यावर यायची ! दक्षिण तटावर सूर्य जणू काही सांगायचा ! चालत रहा मी तुझ्या पाठीशी आहे ! मानेला भयानक चटके बसायचे . त्यामुळे गळ्यातला रुमाल मानेवर झाकून घ्यायचो . उत्तर तटावर मात्र सूर्य सतत समोर असायचा . त्यामुळे डोळ्याला अंधारी यायची . देहाकडे लक्ष नव्हतेच . पण लक्ष गेल्यावर लक्षात यायचे की आपला रंग आयुष्यात कधी नव्हे इतका काळवंडला आहे. म्हणजे आरशात बघायची संधी कधी मिळत नसे परंतु हाताच्या रंगावरून लक्षात यायचे . यालाच म्हणतात तापणे किंवा तप घडणे ! मैया परिक्रमावासीला रताळ्यासारखी भाजून उकडून काढते ! आधी ताप ताप तापायचे ! आणि मग अचानक मैया मध्ये बुडायचे ! सगळेच टोकाचे ! पण तीच सहनशक्ती देते . तीच तुम्हाला बळ देते . तीच तुमची रक्षणकर्ती असते . आपल्याला फक्त या गोष्टीचा विसर पडू द्यायचा नसतो . आज एक असा प्रसंग आला की