पोस्ट्स

वाल्मिकी आश्रम लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक ९३ : वाल्मिकी आश्रम बोरिया इथले अश्वत्थाम्याने स्थापन केलेले श्री माखणेश्वर शिवलिंग

इमेज
दुपारी निघाल्यावर नर्मदा मातेच्या किनाऱ्याने जावे असा विचार करत असतानाच एका साधूने सांगितले की इथून केवळ पाच किलोमीटर अंतरावर अश्वत्थाम्याची तपोभूमी आहे . तिचे दर्शन अवश्य करावे . बोरिया नावाचे हे गाव आहे . इथे अश्वत्थामा स्वतः राहिलेला असून त्याने स्वतःच्या हाताने माखनेश्वर नावाचे शिवलिंग स्थापन केलेले आहे . इथून नर्मदा मातेचा तट केवळ तीन किलोमीटर आहे . आल्यासरशी या स्थानाचे दर्शन करावे असा विचार केला , आणि बोरिया बिस्तर उचलून डांबरी सडकेने चालत बोरिया गाव गाठले . गावामध्ये शेती आणि झाडी चांगली होती . अश्वत्थाम्याच्या कठोर तपामुळे महादेव त्याला इथे प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याच्या कपाळाला माखन लावले अर्थात लोणी लावले म्हणून या महादेवाचे नाव माखनेश्वर / माखणेश्वर किंवा नवनीतेश्वर असे पडले . (गुजराती मध्ये माखणेश्वर असे म्हणतात ) . त्यामुळे इथे असलेल्या शिवलिंगाला पाण्यासोबतच लोण्याने देखील लेप केला जातो . इथल्या शिवलिंगाचे वैशिष्ट्य असे आहे की याचा आकार दरवर्षी थोडा थोडा वाढत आहे . पूर्वी अतिशय छोटे असलेले हे शिवलिंग आता जलहरीच्या देखील बाहेर आलेले आहे . गणपतीपुळे मूळ गाव असलेले बडोद्...