पोस्ट्स

प्रल्हाद पटेल लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक १३ : दत्तप्रभूंची इच्छा

इमेज
दुपारी मोकळा वेळ मिळाल्यावर मी प्रल्हाद पटेल यांच्या २२ एकर शेताला वळसा मारून , मागे असलेल्या वीटभट्टीच्या शेजारून वाहणाऱ्या एका छोट्याशा परंतु सुंदर अशा रानवे नामक नदीमध्ये कपडे धुऊन घेतले .  तिथल्याच खडकावरती पाच दहा मिनिटात कपडे वाळले सुद्धा . संध्याकाळी प्रल्हाद पटेल आले आणि माझ्या शेजारी येऊन बसले . त्यांच्याविषयी ते सांगू लागले .गेली २१ वर्षे अव्याहतपणे न चुकता , २७ किलोमीटर दूर जाऊन ग्वारी घाटावरील नर्मदा दर्शनाची वारी ते करत होते . ते मला म्हणाले , मला काय वाटले माहिती नाही .परंतु तुम्ही आज इथे मुक्काम करावा अशी दत्तप्रभूंची इच्छा आहे , असा संकेत मला झाला .म्हणून मी तुम्हाला थांबवले . नाही तर शक्यतो मी कोणालाच थांबवत नाही . भारतीय जनता पक्षाच्या कार्याविषयी ते अतिशय तळमळीने बोलत होते . या पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांची नुकतीच पुण्यामध्ये काही कामा निमित्त माझी भेट झाली होती व ते त्यांच्या सोबत जावडेकरांच्या मुलाच्या पुस्तक प्रकाशनाच्या एका कार्यक्रमाला देखील मला घेऊन गेले होते .हे सांगितल्यावर तर डॉक्टर प्रल्हाद पटेल माझ्या इथून हलेचनात ! कारण हे राष्ट्रीय उपाध्य