पोस्ट्स

jabalpur लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ७ : नाभिकाने केलेला जाहीर __मान !

इमेज
आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये क्षौर करणे याला फार महत्त्व आहे . कारण मनुष्य कसा दिसणार हे बव्हंशी आपल्या केशरचनेवर अवलंबून असते . केस विस्कटलेला मनुष्य अस्ताव्यस्त दिसतो व केसांची निगा राखणारा मनुष्य सुस्वरूप दिसतो हे उघड सत्य आहे . त्यामुळे जन्मापासून माणसाचे आपल्या केसांवर फार प्रेम असते . त्यामुळे आपल्या जवळ असलेल्या मायेचे प्रकट स्वरूप म्हणून केसांकडे पाहिले जाते व मायेचा त्याग याचे प्रतीक म्हणून सर्वप्रथम केसांचा त्याग केला जातो .  परिक्रमेदरम्यान पुन्हा केस व नखे यांना हात लावायला परवानगी नसते . परिक्रमा पूर्ण होईपर्यंत नखे व केस यांची मुक्त वाढ होऊ द्यायची असते .भारतात सर्वत्र ही प्रथा दिसते . अगदी दक्षिण भारतातील अय्यप्पाची यात्रा करणारे लोक किंवा आंध्रात श्रीशैल्यम मल्लीकार्जुनाचे महाशिवरात्र व्रत करणारे देखील ही प्रथा महिनाभर पाळतात . मी घाटावरती गेलो .अभिषेक त्रिपाठी नामक एका ब्राह्मणाने मला बोलावले व काय हवे विचारले .मी केश कर्तन करावयाचे आहे हे सांगितल्यावर त्याने शेजारून चाललेल्या राम लखन सेन नामक नाभिकाला हाक मारली व त्याचे सोबत मला पाठविले . माझ्या शहरी मेंद

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

इमेज
जबलपूर स्थानकावर उतरलो आणि बाहेर आलो . जबलपूर बद्दल मी खूप वर्षांपासून ऐकून होतो . सज्जनगडावर येणाऱ्या एक रामदासी साध्वी पूज्य कमलताई पटवर्धन रामदासी यांचा जबलपूर येथे मठ होता .यांनी स्वतः १९७२ / ७३ साली दोन पायी परिक्रमा केलेल्या होत्या व त्यांच्या अनुभूती देखील अलौकिक अशा होत्या . त्यांचा आश्रम कुठे आहे हे मला माहिती नव्हते परंतु "इंद्रपुरी कॉलनी , ग्वारी घाट मार्ग " असा त्यांचा पत्ता माझ्या डोक्यामध्ये पक्का बसलेला होता .मला असे वाटले की जबलपूर स्थानकापासून नर्मदा मातेचा काठ जवळ असेल परंतु चौकशी केली असता असे सांगण्यात आले की तिथून नर्मदा मैयाचा काठ आठ किलोमीटर लांब आहे ! आठ किलोमीटर पायी चालायचे ? असा मोठा प्रश्न मला त्या क्षणी पडला होता हे प्रामाणिकपणे नमूद करतो ! परंतु खिशात दमडी नसल्यामुळे पर्याय देखील नव्हता त्यामुळे शांतपणे ग्वारी घाटचा रस्ता पकडला . वाटेत एक शेअर रिक्षावाला माझ्या शेजारी थांबला आणि मला म्हणाला , " बाबाजी बैठ जाओ । "  बाबाजी वगैरे कोणी मला म्हणते आहे अशी अजिबात सवय नव्हती त्यामुळे मौज वाटली आणि मी त्याला म्हणालो , "भैय्या म