पोस्ट्स

लोढा पहाड लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक २४ : दमगढची रामकुटी

इमेज
आता फक्त थोडेसे अंतर चालल्यावर नर्मदा मातेचे उगमस्थान अर्थात अमरकंटक चे अद्भुत दर्शन होणार होते ! फेरी सेमल आणि दमगड गावे ओलांडून रामकुटी मध्ये जावे , तिथे सदाव्रत घेऊन पुढे मैयाच्या काठाकाठाचा मार्ग पकडत पुढे अमरकंटकला पोहोचावे असे नियोजन मनात सुरु होते .   दमगढ पूर्वीचे आरण्य  मार्गा तील खुणेच्या चिंध्या परंतु राम कुटी आश्रमामध्ये तेथील महंत श्रीराम महाराज आलेले आहेत असे कळाले आणि त्यांचे दर्शन अवश्य घ्यावे असे देखील गावातील लोकांनी सांगितले . त्यामुळे रामकुटीचा मार्ग पकडला .  मार्गदर्शक फलक मार्ग म्हणजे कच्ची पायवाटच होती आणि पावसामुळे तिचा पुरेपूर चिखलदरा झाला होता ! वाटेमध्ये बाबांना भेटायला आलेल्या शहरी भक्तांच्या चिखलात रुतलेल्या एकेक गाड्या दिसू लागल्या ! जिथे गाडी रुतेल तिथेच ती सोडून चालत जाण्याशिवाय भक्तांकडे दुसरा पर्याय नव्हता ! आधी अल्टो मारुती अशा छोट्या गाड्या चिखलात फसल्या होत्या . पुढे इंडिका , वगैरे गाड्या रुतल्या होत्या . सर्वात शेवटी इनोवा , एण्डेवर अशा मोठ्या ताकदवान गाड्या चिखलात परिपूर्ण ...