पोस्ट्स

लंगोटी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक १२ : वेश धरावा बावळा

इमेज
परिक्रमेच्या पहिल्याच दिवशी मी सुमारे १८ ते २० किलोमीटर पायी चाललो होतो ! हा आकडा खरे तर आश्वासक होता परंतु नर्मदा मातेच्या मनात काहीतरी वेगळेच होते . सकाळी थंडी जास्त असल्यामुळे तुम्ही कितीही वेगाने चालले तरी तुम्हाला फारसा घाम येत नाही . किंवा जरी घाम आला तरी थंड वातावरण असल्यामुळे तो सुखद असतो . हा संपूर्ण परिसर थंडीसाठी प्रसिद्ध होता . माझे हात अक्षरशः गोठून जात होते . माझ्या दंडाला (काठीला )दोन्ही बाजूंनी असलेले धातूंचे गठ्ठू अक्षरशः बर्फासारखे गार पडत . वेताचा दंड देखील खूप गार पडायचा . एकदा त्याला जिथे पकडले तिथेच धरून ठेवावे लागायचे . हात जरा देखील वर खाली केला की हाताला गार लागायचे . माझ्याकडे हातमोजे ,कान टोपी , मफलर ,स्वेटर वगैरे काहीच नव्हते . परंतु छाटी हे जे वस्त्र मी घालायचो त्यात छातीवरती कापडाचे दोन पदर येतात त्यामुळे छातीला थंडी कमी वाजायची . मला या छाटी वस्त्राची पूर्वीपासून सवय आहे . आपली छाती आणि कान गरम राहिले की थंडी फारशी वाजत नाही हे सूत्र लक्षात ठेवावे .     हेळवाक घळ येथे छाटी आणि उपरणे (उपवस्त्र) घालून प्रस्तुत लेखक ( महाविद्यालयीन ...