पोस्ट्स

शंखचूडेश्वर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ९७ : सेहराव मधील शंखचूडेश्वर , शूलपाणी गुंफा व हरी गिरी साधू

इमेज
 पुढे निघाल्यावर लक्षात येऊ लागले की आता झाडी सुरू झाली आहे . अंधार ही हळूहळू वाढू लागला . पुढे कुठलेच गाव किंवा घाट असल्याचे चिन्ह दिसेना . आता मात्र संकटात सापडतो की काय असे वाटू लागले . एकतर पुन्हा खोल पाणी सुरू झाल्यामुळे मगरींचा वावर वाढला होता . त्यात अंधार पडायला सुरुवात झाली होती . त्यात दोन-तीन भयंकर ओढे नाले आडवे आले . एक तर फार खोल होता . तो पार करून पुढे जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते . मी एका झाडाच्या मुळाला लटकून कसाबसा खाली उतरलो . परंतु माझ्यासोबत विठ्ठल महाराज पठाडे होते . त्यांना थोडे कठीण जाऊ लागले . मी झोळी खाली ठेवून पुन्हा वर गेलो . त्यांचे सामान घेऊन खाली आलो . मग पुन्हा वर गेलो आणि त्यांना घेऊन खाली आलो ! हे करताना माझ्या लक्षात आले की तो ओढा सुरुवातीला जितका कठीण वाटत होता तितका पुढच्या वेळी वाटला नाही ! आयुष्याचे असेच आहे ! एखादी गोष्ट नवी-नवी करताना कठीण वाटू शकते . एकदा सरावाची झाली की सोपी वाटू लागते . नर्मदा परिक्रमेतील कठीण मार्गांचे गणित असेच आहे . प्रथमच सर करताना तुम्हाला कदाचित ते कठीण वाटतील . परंतु सरावाने तुम्हाला माहिती होते की हे वाटते तेवढे कठीण नाह